Live Cricket Score, India vs Australia 4th Test, 3rd Day: ढगाळ वातावरणामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, ऑस्ट्रेलिया २३६- ६

Live Cricket Score, India vs Australia 4th Test, 3rd Day: ढगाळ वातावरणामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, ऑस्ट्रेलिया २३६- ६

India vs Australia 4th Test, Day3 Live Score, Ind vs Aus | Live Cricket Scorecard, Updates and Commentary

  • Share this:

सिडनी, ०५ जानेवारी २०१९- पावसामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला आहे. आजचा उरलेला दिवस भरुन काढण्यासाठी पुढचे दोन दिवस सामना अर्धा तास लवकर सुरू करण्यात येईल. उद्या आणि परवा सामना पहाटे ४.३० वाजता सुरू होईल. तोपर्यंत ऑस्ट्रेलियाचा स्कोअर २३६- ६ एवढा होता. ऑस्ट्रेलियासाठी दुसरा दिवस आतापर्यंत फारसा चांगला गेला नाही. एकामागोमाग एक ऑस्ट्रेलियाच्या विकेट पडत गेल्या. कुलदीप यादवने आतापर्यंत तीन गडी बाद केले तर रवींद्र जडेजाने दोन आणि मोहम्मद शमीने एक गडी बाद केला. मार्कस हॅरिसने सर्वात जास्त ७९, लबुशान ३८ आणि हेडने २० धावा केल्या. कमिन्स २५ आणि हँड्सकॉम्ब २८ धावा करुन मैदानावर टिकून आहेत. पावसाची शक्यता असल्यामुळे पिच कव्हर करण्यात आले आहे.

ऑस्ट्रेलियाच्या ६ विकेट २०० धावांच्या आतच गेल्या होत्या. कुलदीप यादवने भारताला पहिलं यश दिलं. उस्मान ख्वाजाने यादवच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, मात्र मिड विकेटकडे उभ्या असलेल्या पुजाराने त्याचा झेल टिपला. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ७२ असताना पहिली विकेट पडली.  मार्कस हॅरिसने २४ व्या षटकात बुमराहच्या गोलंदाजीवर एक रन घेत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्याने अवघ्या ६७ चेंडूत ५ चौकारांच्या मदतीने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. हे त्याचं कसोटीतील दुसरं अर्धशतक आहे.

लंचब्रेकनंतर लगेच भारताला दुसरं यश मिळालं. रवींद्र जडेजाने मार्कस हॅरिसला ७९ धावांवर बाद केलं. हॅरिसने १२० चेंडूत आठ चौकारांसह ७९ धावा केल्या होत्या. टीम इंडियाला ही जोडी फोडणं फार आवश्यक होतं. कारण हॅरिस आणि मारनस हे दोन्ही खेळाडू फॉर्ममध्ये होते. हॅरिसच्या बॅटच्या आतल्या भागाला जडेजाचा बॉल चाटून गेला आणि हॅरिस त्रिफळाचीत झाला.

यानंतर थोड्याच वेळी ऑस्ट्रेलियाची तिसरी विकेट गेली. जडेजाचा बॉल टर्न होईल असं शॉन मार्शला वाटत होतं. मात्र असे काही झाले नाही आणि रहाणेने स्लिपमध्ये त्याचा अप्रतिम झेल घेतला. मार्श अवघ्या ८ धावा करुन तंबूत परतला.

लबुशानने शमीच्या गोलंदाजीवर ड्राइव शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र अजिंक्य रहाणेने शॉर्ड मिड विकेटकडे अफलातून झेल घेतला. लबुशान ३८ धावा करुन बाद झाला. अवघ्या १५२ धावांवर ऑस्ट्रेलियाचे चार फलंदाज तंबूत परतले होते.

टीम इंडियाला पाचवी विकेट कुलदीप यादवने मिळवून दिली. कुलदीपने ट्रॅविस हेडला त्याच्याच गोलंदाजीवर झेल बाद केले. ऑस्ट्रेलियाच्या १९२ स्कोअरवर पाचवी विकेट गेली. त्यानंतर कुलदीपनेच कर्णधार टिम पेनला त्रिफळाचीत केले. पेन फक्त ५ धावा करुन तंबूत परतला. कुलदीपची ही या सामन्यातील तिसरी विकेट होती. कुलदीपच्या गोलंदाजीचा सामना कसा करायचा हा प्रश्न ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना पडला आहे.

चेतेश्वर पुजाराच्या (१९३) विकेटनंतर यष्टीरक्षक ऋषभ पंतनेही दीडशतकी कामगिरी केली. तो १५९ धावा करत नाबाद राहिला. फलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारताने चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर तडगा स्कोअर उभा केला. या स्कोअरमुळे ऑस्ट्रेलियाच्या जमिनीवर इतिहासात पहिल्यांदा मालिका जिंकण्याची टीम इंडियाची आशा पल्लवीत झाली आहे.

भारताने आपला पहिला डाव सात विकेट गमावत ६२२ धावांवर घोषीत केला. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही विकेट न गमावत २४ धावा केल्या. भारताने या मैदानावर पहिल्या डावात ६०० किंवा त्याहून जास्त धावा केल्या तर कधीही पराभूत झालेली नाही.

भारतीय संघ- लोकेश राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.

ऑस्ट्रेलियाचा संघ- मार्कस हॅरिस, उस्मान ख्वाजा, मारनस लैबुशांगे, शॉन मार्श, पीटर हँड्सकॉम्ब, ट्रॅविस हेड, टिम पेन (कर्णधार आणि यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नाथन लायन, जोश हेजलवुड.

First published: January 5, 2019, 7:15 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading