Live Cricket Score, India vs Australia 4th Test, 4th Day: घरच्या मैदानात ऑस्ट्रेलियावर फॉलोऑनची नामुष्की, भारत ऐतिहासिक विजय साकारणार?

India vs Australia 4th Test, 4th Day Live Score, Ind vs Aus | Live Cricket Scorecard, Updates and Commentary

News18 Lokmat | Updated On: Jan 6, 2019 10:24 AM IST

Live Cricket Score, India vs Australia 4th Test, 4th Day: घरच्या मैदानात ऑस्ट्रेलियावर फॉलोऑनची नामुष्की, भारत ऐतिहासिक विजय साकारणार?

सिडनी, ०६ जानेवारी २०१९- ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ अवघ्या ३०० धावा करुन तंबूत परतला. अंतिम सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने त्यांच्या पहिल्या डावात ३०० धावा केल्याने भारताकडे  अजूनही ३२२ धावांची आघाडी आहे. यामुळेच भारताने ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियासाठी मार्कस हॅरिसने सर्वाधिक ७९ धावा केल्या. त्याशिवाय मारनस लैबुशांगेने ३८ आणि पीटर हँड्सकॉम्बने ३७ धावा केल्या. भारतासाठी कुलदीप यादवने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या. तर रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर जसप्रीत बुमराहने एक गडी बाद केला.

पावसामुळे थांबलेला खेळ पुन्हा सुरू झाला. सामना सुरू झाल्यानंतरच्या दुसऱ्याच षटकात ऑस्ट्रेलियाचा सातवा गडी बाद झाला. मोहम्मद शमीने पॅट कमिन्सला त्रिफलाचित केले. कमिन्स २५ धावा करुन बाद झाला. तर जसप्रीत बुमराहने पीटर हँड्सकॉम्बला ३७ धावांवर बाद केले. ऑस्ट्रेलियाच्या आतापर्यंत आठ गडी बाद झाले असून त्यांच्यावर फॉलोऑनचा धोका आहे.

याआधी पावसामुळे चौथ्या दिवसाच्या खेळाला उशीराने सुरुवात झाली. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सुरू असलेल्या यासामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ त्यांचा पहिला डाव खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाने शनिवारी तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत सहा विकेट गमावत २३६ धावा केल्या होत्या. पीटर हँड्सकॉम्ब (२८) आणि पॅट कमिन्स (२५) नाबाद खेळत होते.

या डावात कुलदीप यादवने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या तर रवींद्र जडेजाने दोन आणि मोहम्मद शमी आणि बुमराहने प्रत्येकी एक विकेट घेतली. भारताने पहिल्या डावात ६२२ धावा करत डाव घोषित केला होता.

भारतीय संघ- लोकेश राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.

Loading...

ऑस्ट्रेलियाचा संघ- मार्कस हॅरिस, उस्मान ख्वाजा, मारनस लैबुशांगे, शॉन मार्श, पीटर हँड्सकॉम्ब, ट्रॅविस हेड, टिम पेन (कर्णधार आणि यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नाथन लायन, जोश हेजलवुड.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 6, 2019 09:10 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...