सिडनी, ०४ जानेवारी २०१९- सिडनी कसोटीत टीम इंडियाने ८ षटकं बाकी असताना आपल्या पहिल्या डावाची घोषणा केली. पुजाराने सर्वात जास्त १९३ धावा केल्या. पंत १५९ धावांवर नाबाद राहिला. तर जडेजा ८१ धावांवर बाद झाला. पहिल्या दिवशी मयंक अग्रवालने ७७ धावा केल्या. सातव्या विकेटसाठी पंत आणि जडेजाने २०४ धावांची भागीदारी केली. टीम इंडियाने तब्बल १६७.२ षटकांपर्यंत फलंदाजी केली. यावेळी नाथन लायनने १७८ धावा देत ४ गडी बाद केले. तर हेजलवुडने २ तर स्टार्कने १ गडी बाद केला. सिडनीतील सर्वाधिक धावसंख्येबद्दल बोलायचे झाले तर हा रेकॉर्डही भारताच्याच नावावर आहे. भारताने २००४ मध्ये ७०५- ७ एवढा स्कोअर केला होता.
ऋषभ पंतने १३७ चेंडूत आपलं अर्शशतक पूर्ण केलं. हे त्याच्या करिअरमधलं दुसरं कसोटी अर्धशतक आहे. तसेच भारताकडून ऑस्ट्रेलियाच्या मैदानात अर्धशतक झळकावणारा तो पहिला भारतीय यष्टीरक्षक आहे. आशियाच्याबाहेर आशियाई यष्टीरक्षकांमध्ये सर्वाधिक शतक ठोकणाऱ्यांमध्ये मोइन खान, मिशिफिकुर रहीम आणि ऋषभ पंत प्रत्येकी २- २ शतकांसह पहिल्या स्थानावर आहेत.
खेळाच्या दुसऱ्या दिवशी चेतेश्वर पुजाराने नेत्रदिपक फलंदाजी केली. त्याने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना मान वर काढण्याची संधीही दिली नाही. मात्र तो १९३ धावांवर बाद झाला आणि करिअरमधलं चौथं द्विशतक करण्यापासून हुकला. दरम्यान ऋषभ पंतने अर्धशतक पूर्ण करत भारताची धावसंख्या ४५० पर्यंत नेली. पाचव्या विकेटसाठी पुजारा आणि हनुमा विहारीने १०० धावांची भागीदारी केली. दरम्यान नाथन लायनने विहारीला शॉर्ट लेगकडे उभ्या असलेल्या लबुशांगेला झेल देण्यास भाग पाडले. विहारीने ९६ चेंडूत ४२ धावा केल्या. भारताची पाचवी विकेट ३२९ धावांवर गेली.
दुसऱ्या दिवसाच्या लंचपर्यंत पुजारा १८१ धावांवर तर ऋषभ पंत २७ धावांवर नाबाद आहे. आतापर्यंत भारताचा स्कोअर ३८९- ५ आहे. लंचपर्यंत हनुमा विहारीची एकट्याची विकेट गेली. हनुमाला नाथन लायनने बाद केले. पहिल्या सत्रात २७ षटकांचा खेळ झाला. या दरम्यान भारताने ८६ धावा करत एक विकेट गमावली. यावेळी भारताने ३.१९ च्या सरासरीने फलंदाजी केली. पंज आणि पुजारामध्ये आतापर्यंत ६० धावांची भागीदारी झाली आहे.
टीम इंडियाने पहिल्या दिवसाचा खेळ संपताना चार विकेट गमावत ३०३ धावा केल्या. चेतेश्वर पुजाराने पहिल्या दिवशी १३० तर हनुमा विहारीने ३९ धावा करत नाबाद राहिले. या दोघांशिवाय मयंक अग्रवालने ७७, कोहलीने २३, केएल राहुल ९ आणि अजिंक्य रहाणेने १८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेजलवुडने सर्वाधिक २ गडी बाद केले. तर स्टार्क आणि लायनने प्रत्येकी एक गडी बाद केले.
भारतीय संघ- लोकेश राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलियाचा संघ- मार्कस हॅरिस, उस्मान ख्वाजा, मारनस लैबुशांगे, शॉन मार्श, पीटर हँड्सकॉम्ब, ट्रॅविस हेड, टिम पेन (कर्णधार आणि यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नाथन लायन, जोश हेजलवुड.
VIDEO : ऑस्ट्रेलियात इतिहास घडवण्याआधी विराट आणि टीम इंडियाचा हटके अंदाज