Ind vs Aus: भारताने रचला इतिहास, ७० वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकली

Ind vs Aus: भारताने रचला इतिहास, ७० वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकली

चार सामन्यांपैकी तीन सामन्यात शतकी खेळी खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाराला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले.

  • Share this:

सिडनी, ०७ जानेवारी २०१९- पाचवा दिवसही पावसामुळे वाया गेल्यामुळे अखेर चौथा आणि अंतिम सामना अनिर्णित घोषीत करण्यात आला. यामुळे भारताने चार सामन्यांच्या या मालिकेत २-१ असा ऐतिहासिक विजय मिळवत कसोटी मालिका खिशात घातली. आतापर्यंत भारताला ऑस्ट्रेलियाच्या जमिनीवर कसोटी मालिका जिंकता आली नव्हती. विराट कोहलीच्या टीमने ही कमतरताही भरुन काढली. सुमारे ७० वर्षांनंतर भारताने ही कामगिरी करुन दाखवली आहे. विराट कोहली ऑस्ट्रेलियामध्ये मालिका जिंकणारा पहिला भारतीय आणि आशियातला पहिला कर्णधार झाला आहे.

चार सामन्यांपैकी तीन सामन्यात शतकी खेळी खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाराला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले. १९८८ नंतर ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदा घरच्या मैदानावर फॉलोऑनचा सामना करत पराभव सहन करावा लागला.

चौथ्या कसोटी सामन्यात ढगाळ वातावरणामुळे तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रापासून खेळ थोड्या थोड्या वेळात थांबवण्यात येत होता. चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ फक्त ३०० धावा करुन तंबूत परतला होता. त्यांच्यावर फॉलोऑनलची नामुष्की आली होती. दुसऱ्यांदा फलंदाजीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ मैदानात उतरलाही होता. मात्र पावसामुळे चौथ्य दिवसाचा खेळ फार काळ चालला नाही. पाचव्या दिवशी पावसामुळे खेळाडू मैदानात उतरलेही नाही. अखेर चौथा सामना अनिर्णित म्हणून घोषित करण्यात आला.

भारतीय संघ- लोकेश राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.

ऑस्ट्रेलियाचा संघ- मार्कस हॅरिस, उस्मान ख्वाजा, मारनस लैबुशांगे, शॉन मार्श, पीटर हँड्सकॉम्ब, ट्रॅविस हेड, टिम पेन (कर्णधार आणि यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नाथन लायन, जोश हेजलवुड.

VIDEO : राज ठाकरेंनी दिलं बाबासाहेब पुरंदरे यांना मुलाच्या लग्नाचं आमंत्रण

First published: January 7, 2019, 9:19 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading