Live Cricket Score, India vs Australia 4th Test, Day 1- पहिल्या दिवशी पुजाराची शतकी खेळी, भारत ३०३- ४

Live Cricket Score, India vs Australia 4th Test, Day 1- पहिल्या दिवशी पुजाराची शतकी खेळी, भारत ३०३- ४

India vs Australia 4th Test, Day1 Live Score, Ind vs Aus | Live Cricket Scorecard, Updates and Commentary

  • Share this:

सिडनी, ०३ जानेवारी २०१९- पहिल्या दिवसाचा खेळ संपताना भारताने चार गडी गमावत ३०३ धावा केल्या. चेतेश्वर पुजारा १३० आणि हनुमा विहारी ३९ धावांवर नाबाद खेळत आहेत. पुजाराशिवाय मयंक अग्रवाल ७७, कोहली २३ आणि रहाणेने १८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेजलवुडने सर्वाधिक २ गडी बाद केले. तर स्टार्क आणि लायनने प्रत्येकी एक गडी बाद केले.

पुजाराने शतकी खेळी खेळत भारताला चांगली धावसंख्या उभारण्यास मदत केली. त्याचं मालिकेतलं हे तिसरं शतक आहे. तसंच कसोटी कारकिर्दीतलं पुजाराचं हे १८ वं शतक आहे. पुजाराने १९९ चेंडूत शतकी खेळी खेळली. भारताकडून सर्वात जलद १८ शतकं पूर्ण करण्यात पुजारा सध्या चौथ्या स्थानावर आहे. सुनिल गावस्कर यांनी ८२ सामन्यात, सचिन तेंडुलकरने ९९ सामन्यात, कोहलीने १०३ सामन्यांत आणि पुजाराने ११४ सामन्यात १८ कसोटी शतकं ठोकली आहेत. याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या मैदानात सर्वातजास्त शतक ठोकणाऱ्यांच्या यादीत पुजारा तिसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर कोहली आहे. त्याने २०१४-१५ मध्ये खेळल्या गेलेल्य मालिकेत ४ शतकं, सुनील गावस्कर यांनी १९७७-७८ मध्ये ३ शतकं आणि पुजाराने २०१८-१९ मध्ये ३ शतकं झळकावली आहेत.

नाणेफेक जिंकल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र दुसऱ्या षटकात केएल राहुलच्या स्वरुपात भारताला पहिला झटका बसला. हेजलवुडच्या गोलंदाजीवर शॉन मार्शने राहुलला झेल टिपला. त्यानंतर पुजारा आणि मयंकने डाव सावरत भारताला सुस्थितीत आणले. दरम्यान मयंकने त्याचं अर्धशतक पूर्ण केलं. त्याचं करिअरमधलं हे दुसरं अर्धशतक आहे. नाथन लायनने मयंकला ७७ धावांवर वाद केले. मयंक षटकार मारण्याच्या प्रयत्नात असताना बाद झाला. त्याआधी त्याने दोन षटकार लगावले होते.पुजारा आणि मयंकने ११६ धावांची भागीदारी केली. पुजारानेही अर्धशतक झळकावलं. टी-ब्रेकपर्यंत ६३ तर कोहली २३ धावांवर नाबाद खेळत आहेत. पुजारा तिसऱ्या विकेटसाठी पुजारा आणि कोहलीमध्ये आतापर्यंत ५१ धावांची भागीदारी झाली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान सिडनी येथे खेळला जाणारा चौथा कसोटी सामना दोन्ही संघासाठी निर्णायक आहे. यावेळी टीम इंडियात दोन बदल करण्यात आले आहेत. रोहित शर्माच्या जागी केएल राहुलला पुन्हा संधी देण्यात आली आहे तर इशांत शर्माला विश्रांती देत कुलदीप यादवला संघात घेण्यात आलं आहे. या सामन्यात भारतीय संघ दोन स्पेशलिस्ट स्पिनर्ससह मैदानात उतरली आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघातही दोन बदल करण्यात आले आहेत. मिचेल मार्श आणि एरॉन फिंच यांना संघातून वगळ्यात आले असून त्यांच्या जागी मार्नस लैबुशांगे आणि पीटर हँड्सकॉम्बला खेळण्याची संधी दिली आहे.

जगातील पहिल्या नंबरची कसोटी टीम म्हणून ओळख असलेला भारतीय संघ गुरुवारपासून सुरू झालेल्या सिडनी क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलियासोबत चौथा आणि शेवटचा कसोटी सामना खेळत आहे. हा सामना जिंकून ७० वर्षांत पहिल्यांदा कसोटी मालिका आपल्या नावावर करण्याची संधी भारतीय संघाकडे आहे. चार सामन्यांच्या या मालिकेत भारताकडे २- १ अशी आघाडी असून चौथ्या सामन्यात भारताचे पारडे जड आहे. भारताने हा सामना अनिर्णित जरी ठेवला तरी भारत ही मालिका २- १ ने जिंकेल. ही ऑस्ट्रेलियाच्या जमिनीवर जिंकलेली पहिली मालिका असेल.

भारतीय संघ- लोकेश राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह

ऑस्ट्रेलियाचा संघ- मार्कस हॅरिस, उस्मान ख्वाजा, मारनस लैबुशांगे, शॉन मार्श, पीटर हँड्सकॉम्ब, ट्रॅविस हेड, टिम पेन (कर्णधार आणि यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नाथन लायन, जोश हेजलवुड

First published: January 3, 2019, 7:01 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading