Live cricket score, India vs Australia 3rd Test, 4th Day- चौथ्या दिवसाचा खेळ संपला, भारत विजयापासून फक्त २ विकेट दूर

Live cricket score, India vs Australia 3rd Test, 4th Day- चौथ्या दिवसाचा खेळ संपला,  भारत विजयापासून फक्त २ विकेट दूर

India vs Australia 3rd Test 4th Day Live Score, Ind vs Aus | Live Cricket Scorecard, Updates and Commentary

  • Share this:

मेलबर्न, २९ डिसेंबर २०१८- अर्ध्या तासाचा खेळ वाढवूनही भारतीय गोलंदाजांना ऑस्ट्रेलियाच्या शेवटच्या दोन विकेट घेण्यात यश आलं नाही. अखेर चौथ्या दिवसाचा खेळ संपवण्यात आला. तिसऱ्या सत्रात ४३ षटकं खेळली गेली. यात १२० धावा काढण्यात आल्या असून फक्त ३ गडी बाद करण्यात आले. पॅट कमिन्सने त्याच्या कसोटी क्रिकेटमधील कारकीर्दीतले दुसरे अर्धशतक झळावले.

मोहम्मद शमीने मिचेल स्टार्कला त्रिफळाचीत करत भारतासाठी आठवी विकेट घेतली. या डावातील शमीची ही दुसरी विकेट आहे. रविंद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनला बाद करुन भारतासाठी सातवी विकेट घेतली. पेनने ६७ चेंडूत चार चौकारांच्या मदतीने २६ धावा करत बाद झाला. ऋषभने पेनचा उत्कृष्ट झेल घेतला. ७२ चेंडूत ऑस्ट्रेलियाने आठ विकेट गमावत २१५ धावा केल्या. सध्या मैदानात नाथन लायन शुन्य आणि कमिन्स २८ धावांवर खेळत आहे. भारतासाठी जडेजाने तीन, बुमराह शमीने दोन तर इशांतने एक विकेट घेतली.

भारताने दिलेल्या ३९९ धावांच्या लक्ष्यचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने टी- ब्रेकपर्यंत पाच विकेट गमावत १३८ धावा केल्या. अजूनही ते २६१ धावांनी पिछाडीवर आहेत. सध्या मैदानात ट्रेविस हेड २९ तर कर्णधार टिम पेन १ धाव करुन तग धरुन  आहेत. भारतासाठी जडेजा आणि बुमराहने प्रत्येकी दोन आणि शमीने एक विकेट घेतली.

मोहम्मद शमीने उस्मान ख्वाजाला बाद करत ऑस्ट्रेलियाला तिसरा झटका दिला. ५९ चेंडूत चार चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने ख्वाजाने ३३ धावा केल्या. पंचांनी एलबीडब्ल्यू म्हणून बाद केल्यानंतर ख्वाजाने रिव्ह्यूची मागणी केली. मात्र रिव्ह्यूमध्येही त्याला बाद ठरवण्यात आले.

रविंद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला. जडेजाने मार्कस हॅरिसला शॉर्ट लेकवर उभ्या असलेल्या मयंक अग्रवालकरवी झेलबाद केले. हॅरिस १३ धावा करुन तंबूत परतला. ऑस्ट्रेलियाचा सध्याच्या स्कोअर १४ षटकांत ४४- २ आहे.ऑस्ट्रेलियाला सामना जिंकण्यासाठी ३९९ धावांचा आकडा गाठायचा आहे. या आकड्याचा पाठलाग करताना बुमराहने एरॉन फिंचला कर्णदार विराट कोहलीकरवी झेल बाद करत ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. फिंच तीन धावा करुन तंबूत परतला.

भारताच्या दुसऱ्या डावात जोश हेजवलवुडने ऋषभ पंतला यष्टीक्षक टिम पेनकरवी बाद केले, भारताने डावाची घोषणा केली. ऋषभने ४३ चेंडूत तीन चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने ३३ धावा केल्या. भारताने दुसऱ्या डावात १०६- ८ धावा केल्या. तर भारताकडे याआधीच पहिल्या डावातील २९२ धावांची आघाडी आहे. यामुळेच ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी ३९९ धावा करणं आवश्यक आहे. भारताने दुसऱ्या डावात ८ गडी गमावले. यातल्या ६ विकेट तर एकट्या पॅट कमिन्सने घेतल्या.

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळल्या जाणाऱ्या या तिसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराह आणि पॅट कमिन्सने घातक गोलंदाजी केली. त्यांच्या गोलंदाजी पुढे अनेक फलंदाजांनी नांगी टाकली.बुमराहने सहा गडी बाद करत ऑस्ट्रेलियाला फक्त १५१ धावात बाद केले.

भारताने आपल्या पहिला डाव ४४३ धावांवर घोषित केला. यामुळेच टीम इंडियाकडे २९२ धावांची आघाडी राहिली. तर भारताकडे ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन देण्याची संधीही उपलब्ध होती. मात्र टीम इंडियाने दुसरा डाव खेळण्याचा निर्णय घेतला.

चांगली आघाडी घेऊन फलंदाजी करायला उतरलेला भारतीय संघ पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर अक्षरशः ढासळला. अखेर भारताने तिसऱ्या दिवसाचा शेवट ५ गडी गमावत ५४ धावांवर केला. दरम्यान, मयंक अग्रवाल मैदानात टिकून राहिला. रोहितने १८ चेंडूत फक्त ५ धावा करुन हेजलवुडच्या गोलंदाजीवर बाद झाला. तर मयंकने ७९ चेंडूत चार चौकार मारत २८ धावा करत नाबाद राहिला.

भारतीय संघ- विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह.

ऑस्ट्रेलियाचा संघ- एरॉन फिंच, मार्कस हॅरिस, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, ट्रेविस हेड, मिचेल मार्श, टिम पेन, पॅट कमिंस, मिचेल स्टार्क, नाथन लायन आणि जोश हेजलवुड.

First published: December 29, 2018, 7:07 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading