Live Cricket Score, India vs Australia 3rd Test, 3rd Day- दुसऱ्या डावात टीम इंडिया कोसळली, पाच गडी बाद

Live Cricket Score, India vs Australia 3rd Test, 3rd Day- दुसऱ्या डावात टीम इंडिया कोसळली, पाच गडी बाद

India vs Australia 3rd Test 3rd Day Live Score, Ind vs Aus | Live Cricket Scorecard, Updates and Commentary

  • Share this:

मेलबर्न, २८ डिसेंबर २०१८- भारताने मेलबर्न कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात ५४- ५ धावा केल्या. खेळ संपताना मयंक अग्रवाल २८ धावांवर आणि ऋषभ पंत ६ धावांवर नाबाद आहेत. भारताकडे ३४६ धावांची आघाडी आहे. तिसऱ्या सत्रात ३०.५ ओव्हर खेळल्या गेल्या. यात ६० धावा करत ८ गडी बाद झाले. यात भारताचे पाच तर ऑस्ट्रेलियाचे तीन गडी बाद झाले. २४ षटकांमध्ये भारताचा स्कोअर ४७- ५ आहे. एकट्या पॅट कमिन्सने भारताला चार  धक्के दिले. विहारीला १३ धावांवर आणि पुजाराला शुन्यावर बाद केल्यानंतर कमिन्सने कोहलीलाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. कोहलीही चार चेंडूंमध्ये एकही धाव न घेता बाद झाला. तर कमिन्सने अजिंक्यला फक्त एक धाव करु दिली आणि त्यालाही झेल बाद केले.

जसप्रीत बुमराहने पहिल्या डावात सहा गडी बाद केले. बुमराहने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनला यष्टीरक्षक ऋषभ पंतकरवी झेल बाद केले. पेनने ८५ चेंडूत २२ धावा केल्या. भारताने दिलेल्या ४४३ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाच्या नाकीनऊ आले आहेत. ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन मिळू शकतो. टी-ब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलियाने ६३ षटकांत ७ विकेट गमावत १४५ धावा केल्या.  लंचनंतर अवघ्या काही वेळातच रविंद्र जडेजाने अजिंक्य रहाणेकरवी मिचेल मार्शला केले झेल बाद. मार्श ९ धावा करत फर्स्ट स्लिपला बाद झाला.

लंचच्याआधी जसप्रीतने बुमराहने ऑस्ट्रेलियाच्या शॉर्न मार्शलला बाद केल्यानंतर लंचनंतर बुमराहनेच ट्रेव्हिस हेडला त्रिफळाचीत करत ऑस्ट्रेलियाला धक्का दिला. ही बुमराहची तिसरी विकेट आहे. भारताची मेलबर्न कसोटी सामन्यावरची पकड स्पष्टपणे दिसते. तिसऱ्या दिवशी लंचच्याआधी भारताने ऑस्ट्रेलियाचे चार गडी बाद केले. जसप्रीत बुमराहने ३३ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर वेळी शॉन मार्शला (१९) एलबीडब्ल्यू केले. बुमराहच्या स्लोअर बॉलला मार्श समजू शकला नाही आणि काही कळायच्याआत तो बाद झाला. सध्या ऑस्ट्रेलियाचा स्कोअर ८९- ४ आहेत. तिसऱ्या दिवशी बुमराहने दोन, इशांत आणि जडेजाने प्रत्येकी एक विकेट घेतली.

ऑस्ट्रेलियाने दुसऱ्य दिवसाचा खेळ संपताना एकही विकेट न गमावत ८ धावा केल्या होत्या. तेव्हा फिच ३ तर मार्कस हॅरिस ५ धावांवर खेळत होते. भारताने पहिला डाव ७ गडी गमावत ४४३ धावा करत घोषित केला. भारतासाठी चेतेश्वर पुजाराने १०६, विराट कोहलीने ८२, मयंक अग्रवालने ७६,  रोहित शर्माने नाबाद ६३, अजिंक्य रहाणेने ३४ आणि ऋषभ पंतने ३९ धावा केल्या.

ऑस्ट्रेलियासाठी पॅट कमिन्सने तीन, मिचेल स्टार्कने दोन आणि जोश हेजलवूड आणि नाथन लायन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. चेतेश्वर पुजाराने ३१९ चेंडून १० चौकारांसह १०६ धावा केल्या. तर विराट कोहलनीने २०४ चेंडूत नऊ चौकारांच्या मदतीने ८२ धावा केल्या. पुजारा आणि कोहलीने ६८ षटकांत १७० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.

टीम पेनने रविंद्र जडेजाला (४) बाद करताच कर्णधार विराट कोहलीने डाव घोषित केला. त्याच्याआधीच्या षटकात  मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर ऋषभ पंतने सोपा झेल देत आपली विकेट गमावली. भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे ३४ धावांवर बाद झाला. नाथन लायनने अजिंक्यलाला बाद केले. अजिंक्यसोबतच भारताचा निम्मा संघ तंबूत परतला. रहाणेने ७६ चेंडूत ३४ धावा केल्या.

भारताने टी- ब्रेकपर्यंत ३४६- ४ एवढा स्कोअर केला आहे. पाचव्या विकेटसाठी रोहित आणि अजिंक्यने ५६ धावांहून जास्तीची भागीदारी केली. लंचनंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा चांगलाच दबाव सामन्यावर जाणवत होता. मिचेल स्टार्कने विराट कोहलीला एरॉन फिंचकरवी झेल बाद केले. त्यानंतर लगेच पॅट कमिन्सने शतकवीर पुजाराला त्रिफळाचीत केले.

'बॉक्सिंग डे'ने मेलबर्न क्रिकेट मैदानात सुरू झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलियामधील तिसऱ्या कसोटी सामन्यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. चार सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघ १ -१ अशा बरोबरीत आहेत. या सामन्यातील विजयामुळे फक्त मालिकेत स्थान घट्ट होणार असं नाही तर २०१८ वर्षाचा शेवट विजयाने केला ही मानसिकता खेळाडूंना पुढील सामन्यांसाठी उपयुक्त ठरेल.

एडिलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारताने सामना जिंकला तर पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाने जसंच्या तसं उत्तर देत मालिकेत आपलं अस्तित्व टिकवून धरलं. तिसऱ्या कसोटी सामन्यात दोन्ही संघ आत्मविश्वासाने मैदानात उतरले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 28, 2018 07:42 AM IST

ताज्या बातम्या