Live cricket score, India vs Australia 3rd Test, Day २- दुसऱ्या दिवसाच्या शेवटी ऑस्ट्रेलिया ८- ०, भारताने ४४३ वर केला डाव घोषित

Live cricket score, India vs Australia 3rd Test, Day २- दुसऱ्या दिवसाच्या शेवटी ऑस्ट्रेलिया ८- ०, भारताने ४४३ वर केला डाव घोषित

India vs Australia 3rd Test, Day 2, Live Score, Ind vs Aus | Live Cricket Scorecard, Updates and Commentary

  • Share this:

मेलबर्न, २७ डिसेंबर २०१८- भारताचा कर्णधार विराट कोहलीने ४४३ धावांनंतर डाव घोषित केल्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून एरॉन फिंड आणि मार्कस हॅरीस ही सलामीची जोडी मैदानात खेळायला आली. दिवसा अखेरीस एकही गडी बाद न करत फिंचने ३ आणि हॅरिसने ५ धावा करत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या नेली. उद्याचा तिसरा दिवस ऑस्ट्रेलियासाठी फार महत्त्वपूर्ण असणार आहे. शेवटच्या षटकात जसप्रीत बुमराहने तीन धावा दिल्या. ऑस्ट्रेलिया अजूनही भारताच्या धावसंख्येच्या ४३५ धावा मागे आहे.

भारत सध्या सुस्थितीत आहे. भारताने पहिला डाव ७ गडी गमावत ४४३ वर घोषित केला. भारतासाठी चेतेश्वर पुजाराने १०६, विराट कोहलीने ८२, मयंक अग्रवालने ७६,  रोहित शर्माने नाबाद ६३, अजिंक्य रहाणेने ३४ आणि ऋषभ पंतने ३९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियासाठी पॅट कमिन्सने तीन, मिचेल स्टार्कने दोन आणि जोश हेजलवूड आणि नाथन लायन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. चेतेश्वर पुजाराने ३१९ चेंडून १० चौकारांसह १०६ धावा केल्या. तर विराट कोहलनीने २०४ चेंडूत नऊ चौकारांच्या मदतीने ८२ धावा केल्या. पुजारा आणि कोहलीने ६८ षटकांत १७० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.

रोहितला सलामीवीर म्हणून खेळवण्याचा विराट करत होता विचार, पण 'या' कारणामुळे बदलला निर्णय

टीम पेनने रविंद्र जडेजाला (४) बाद करताच कर्णधार विराट कोहलीने डाव घोषित केला. त्याच्याआधीच्या षटकात  मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर ऋषभ पंतने सोपा झेल देत आपली विकेट गमावली. भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे ३४ धावांवर बाद झाला. नाथन लायनने अजिंक्यलाला बाद केले. अजिंक्यसोबतच भारताचा निम्मा संघ तंबूत परतला. रहाणेने ७६ चेंडूत ३४ धावा केल्या. भारताने टी- ब्रेकपर्यंत ३४६- ४ एवढा स्कोअर केला आहे. पाचव्या विकेटसाठी रोहित आणि अजिंक्यने ५६ धावांहून जास्तीची भागीदारी केली. लंचनंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा चांगलाच दबाव सामन्यावर जाणवत होता. मिचेल स्टार्कने विराट कोहलीला एरॉन फिंचकरवी झेल बाद केले. त्यानंतर लगेच पॅट कमिन्सने शतकवीर पुजाराला त्रिफळाचीत केले.

India vs Australia- शतकापासून मुकल्यानंतरही विराटने रचला इतिहास, राहुल द्रविडचा तोडला रेकॉर्ड

पुजाराच्याआधी विराटने  मिचेल स्टार्कला अगदी सोपी विकेट दिली. स्टार्कने एरॉन फिंचकरवी त्याला झेल बाद केले. त्याने २०४ चेंडूंचा सामना करत ८२ धावा केल्या. विराट आणि पुजाराने भारताच्या तिसऱ्या विकेटसाठी ६८ षटकांत १७० धावांची भागीदारी केली. पुजाराने २८० चेंडूंचा सामना करत १० चौकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. हे त्याचे मालिकेतले दुसरे शतक आहे. विराट कोहलीनेही ११० चेंडूंचा सामना करत सहा चौकांरांच्या मदतीने कसोटी सामन्यातले आपले २० वे अर्धशतक पूर्ण केले.

भारत ऑस्ट्रेलियादरम्यान मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जाणाऱ्या तिसऱ्या सामन्याचा पहिला दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मयंक अग्रवालच्या नावावर राहिला. मयंकला उत्तम साथ मिळाली ती चेतेश्वर पुजाराची. दोघांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने पहिल्या दिवशी खेळ संपेपर्यंत ८९ षटकांत दोन गडी गमावत २१५ धावा केल्या. कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने या सामन्यात अनेक बदल केले. मयंक अग्रवाल आणि हनुमा विहारी या नवीन जोडीला सलामीवीर म्हणून खेळवले.

‘लेडी लक’ने बदललं नशीब, पहिल्याच सामन्यात ठोकले अर्धशतक

बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारतासाठी हनुमा विहारी आणि मयंक अग्रवालने सलामीवीर जोडीची जबाबदारी सांभाळली. सलामीवीर जोडी म्हणून दोघांचा हा पहिलाच सामना होता. तसेच ऑस्ट्रेलियामध्ये असं करणारी ही पहिली भारतीय जोडी ठरली आहे. मयंक आणि विहारीने भारताला ४० धावांची चांगली सुरुवात करुन दिली होती. मात्र पॅट कमिन्सने हनुमा विहारीला (८) एरॉन फिंचकरवी झेल बाद केले.

मेलबर्नमध्ये या जोडीने १८.५ षटकांपर्यंत फलंदाजी केली. जुलै २०११ नंतर दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्युझीलँड आणि ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय सलामीवीरांचं सर्वोत्कृष्ट प्रदर्शन आहे. डिसेंबर २०१० मध्ये गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवागने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियन मैदानात २९.३ षटकं खेळली होती.

भारताला पहिल्या दिवसाच्या टी-ब्रेकआधी दुसरा धक्का बसला. भारताचा सलामीवीर मयंक अग्रवाल झेल बाद झाला. पॅट कमिन्सने त्याला बाद केले. मयंकने १६१ चेंडूत ७६ धावा केल्या. अग्रवालने अवघ्या ९५ चेंडूत आपल्या करिअरचं पहिलं अर्धशतक पूर्ण केलं. तो पदार्पणाच्या कसोटी सामन्यात अर्धशतक ठोकणारा भारताचा सातवा खेळाडू झाला. याआधी शिखर धवन (१८७), पृथ्वी शॉ (१३४), केसी इब्राहिम (८५) गावस्कर (६५), अरुण लाल (६३) आणि दिलावर हुसैन (५९) यांनी ही कामगिरी केली आहे.

'बॉक्सिंग डे'ने मेलबर्न क्रिकेट मैदानात सुरू झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलियामधील तिसऱ्या कसोटी सामन्यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. चार सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघ १ -१ अशा बरोबरीत आहेत. या सामन्यातील विजयामुळे फक्त मालिकेत स्थान घट्ट होणार असं नाही तर २०१८ वर्षाचा शेवट विजयाने केला ही मानसिकता खेळाडूंना पुढील सामन्यांसाठी उपयुक्त ठरेल. एडिलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारताने सामना जिंकला तर पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाने जसंच्या तसं उत्तर देत मालिकेत आपलं अस्तित्व टिकवून धरलं. तिसऱ्या कसोटी सामन्यात दोन्ही संघ आत्मविश्वासाने मैदानात उतरले आहेत.

भारताने सामन्याच्या एक दिवसआधी आपला संघ घोषित केला. कर्णधार विराट कोहलीने केएल राहुलच्याजागी मयंक अग्रवालला संधी दिली. बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातून मयंकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. मयंकसोबत सलामीवीर म्हणून सहाव्या स्थानावर फलंदाजी करणाऱ्या हनुमाला सलामीवीर म्हणून पाठवण्यात आले.

First published: December 27, 2018, 7:50 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading