India vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान

India vs Australia 2nd Test 1st day: पहिल्या दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया २७७/६, भारतासमोर कडवं आव्हान

ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांनी अर्धशतकी खेळी खेळल्यामुळे त्यांनी २७७ पर्यंत सहज मजल मारता आली.

  • Share this:

पर्थ, १४ डिसेंबर २०१८- दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिल्या दिवसाचा खेळ संपला असून ऑस्ट्रेलियाने ६ गड्यांच्या मोबदल्यात २७७ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन (१६) आणि पॅट कमिंस (११) सध्या मैदानात असून भारतासमोर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी कडवं आव्हान दिलं आहे. ऑस्ट्रेलियाकडून मार्कस हॅरिसने सर्वाधिक ७० धावा केल्या. त्याच्यासोबत एरॉन फिंच (५०), शॉन मार्श (४५), ट्रॅविस हेड (५८) यांनी साजेशी फलंदाजी केली.


उस्मान ख्वाजा (५) आणि पिटर हॅड्सकोम्ब (७) यांनी मात्र फलंदाजीत निराशा केली. ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांनी अर्धशतकी खेळी खेळल्यामुळे त्यांनी २७७ पर्यंत सहज मजल मारता आली. भारतीय गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर इशांत शर्मा आणि हनुमा विहारीने प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर जसप्रीत बुमराह आणि उमेश यादवला प्रत्येकी एक गडी बाद करण्यात यश आले. मोहम्मद शमीला पहिल्या दिवशी एकही गडी बाद करता आला नाही.


दुसऱ्या कसोटी सामन्याचं पहिलं सत्र पूर्णपणे ऑस्ट्रेलियाच्या नावावर राहीलं. भारतीय गोलंदाजांनी टिचून मारा केला मात्र ऑस्ट्रेलियाच्या एरॉन फिंच (२८) आणि मार्कस हॅरिस (३६) या सलामीच्या जोडीने संयमी खेळ खेळत लंक ब्रेकपर्यंत स्कोअर एकही गडी न गमावत ६६ पर्यंत नेला. विराटने पहिल्या सत्रात चार जलदगती गोलंदाजांना खेळवले होते. मात्र एकाही गोलंदाजाला अपेक्षित यश मिळालं नव्हतं. तोपर्यंत फक्त सहा टक्के चेंडूच स्टंप्सवर लागले होते. तर ऑस्ट्रेलियाने २३ टक्के चेंडू सोडले होते. त्यांनी पहिल्या कसोटी सामन्यात ३२ टक्के चेंडू सोडले होते. ऑस्ट्रेलियाच्या सलामीच्या जोडीने मैदानात आपले पाय चांगलेच रोवले.


भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यातील दुसरा सामना आजपासून पर्थ स्टेडिअमवर खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. कर्णधार विराट कोहलीने संघात दोन बदल केले. रोहित शर्मा आणि आर. अश्विनच्या जागी हनुमा विहारी आणि उमेश यादव यांना संघात सहभागी केले आहेत. दुसरा सामना जिंकत भारत मालिकेत २-० अशी आघाडी मिळवण्याचा प्रयत्न करेल. तर ऑस्ट्रेलिया हा सामना जिंकत मालिका १-१ अशी बरोबरीत करण्याचा प्रयत्न करेल. भारतीय संघाने एडिलेड येथे खेळण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियावर ३१ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.


एडिलेड मैदानात टीम इंडियासाठी चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेने धावा केल्या होत्या. मात्र दुसऱ्या सामन्यात दुखापतग्रस्त रोहित शर्मा आणि आर. अश्विनची अनुपस्थिती भारतासाठी चिंताग्रस्त विषय आहे. कमरेच्या दुखापतीमुळे आणि रोहित क्षेत्ररक्षण करताना पाठीवर पडल्यामुळे दुखापतग्रस्त झाले आहेत. यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात ते खेळणार नाही. भारतीय संघात उमेश यादव, हनुमा विहारी आणि रविंद्र जडेजा यांचा समावेश करण्यात आला आहे.


कोहलीच्या मते, ऑस्ट्रेलियाच्या संघाने ३०० पर्यंतच्या धावा केल्या तरीही जर गोलंदाज २० गडी बाद करु शकले तर जिंकणं अशक्य नाही. या सामन्यातून हनुमाला खेळण्याची संधी मिळू शकते. ऑस्ट्रेलियाच्या संघाबद्दल बोलायचे झाले तर, त्यांच्याकडे जोश हेजलवुड, मिशेच स्टॉर्क, नाथन ल्योनसारखे गोलंदाज आहेत. सध्या ऑस्ट्रेलियन संघाचं मुळ ध्येय हे पुजाराला लवकरात लवकर बाद करण्याकडे असेल.


ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी एडिलेडमध्ये सपशेल निराशा केली. ट्रेविस हेड आणि शॉर्न मार्श सोडून इतर कोणत्याही फलंदाजांनी ४० हून अधिक धावा केल्या नाहीत. अशा परिस्थितीत १-१ अशी बरोबर करण्यासाठी उस्मान ख्वाजा आणि एरॉन फिंचला मैदानावर अधिक काळ फलंदाजी करावी लागेल यात काही शंका नाही.


भारतीय संघ- विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव.


ऑस्ट्रेलियाचा संघ- टिम पेन (कर्णधार/ यष्टीरक्षक), एरॉन फिंच, मार्कस हैरिस, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पीटर हैंड्सकॉम्ब, ट्रेविस हेड, मिशेल स्टॉर्क, पैट कमिंस, नाथन ल्योन और जोश हेजलवुड.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 14, 2018 03:36 PM IST

ताज्या बातम्या