News18 Lokmat

India vs Australia- पर्थ कसोटी सामन्यात भारताचा दारुण पराभव, सीरिजमध्ये १-१ ची बरोबरी

भारताच्या पराभवात ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज नाथन लायनने (५/ ६७) मुख्य भूमिका बजावली.

News18 Lokmat | Updated On: Dec 18, 2018 09:39 AM IST

India vs Australia- पर्थ कसोटी सामन्यात भारताचा दारुण पराभव, सीरिजमध्ये १-१ ची बरोबरी

पर्थ, १८ डिसेंबर २०१८- अखेर कागदावर मजबूत वाटणाऱ्या टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाच्या संघाने दारुण पराभव केला. ऑस्ट्रेलियाने १४६ धावांनी पराभव करत मालिकेत १- १ अशी बरोबरी घेतली. पाचव्या दिवशी भारताने १५ षटकं फलंदाजी करत फक्त २८ धावा केल्या. यात टीम इंडियाने ५ विकेटही गामवल्या. तिसरा कसोटी सामना २६ डिसेंबरला मेलबर्नमध्ये खेळण्यात येईल.


पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत पहिल्या डावात मार्कस हॅरिस (७०), एरॉन फिंच (५०) आणि ट्रेविस हेड (५८) यांच्या फलंदाजीच्या जोरावर ३२६ धावा केल्या. तर भारतीय संघाने विराट कोहलीच्या १२३ आणि अजिंक्य रहाणेच्या ५१ धावांच्या जोरावर फक्त २८३ धावा केल्या. भारताच्या पराभवात ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज नाथन लायनने (५/ ६७) मुख्य भूमिका बजावली.
दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाया उस्मान ख्वाजाने ७२ आणि कर्णधार टिम पेनने ३७ धावा केल्या. त्यांच्या या धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने २४३ स्कोअर केला. तर भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीने ५६ धावांच्या बदल्यात ६ गडी बाद केले. भारतीस संघाला दुसरा कसोटी सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाने २८७ धावांचे आव्हान दिले होते. मात्र या धावांचा पाठलाग करताना भारताच्या नाकीनऊ आले.


केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे यांसारख्या फलंदाजांनी विकेट टाकल्यामुळे भारत हा सामना हरणार हे चौथ्या दिवशीच स्पष्ट झाले होते. अजिंक्य रहाणेने ३० तर विजयने २० धावा केल्या. चौथ्या दिवसाचा खेळ संपताना हनुमा विहारी २४ आणि ऋषभ पंत ९ धावांवर खेळते होते. मात्र पाचव्या दिवशी दोघंही फार काळ मैदानावर टिकू शकली नाही.


दरम्यान, पहिल्या डावात ४३ धावांची आघाडी घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाने भारताला २८७ धावांचं लक्ष्य दिलं. भारतीय संघ दुसऱ्या डावात चांगली कामगिरी करेल असं वाटत असताना नेमके उलटे झाले. दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणे आणि ऋषभ पंत यांनी सर्वाधिक म्हणजे ३० धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला ३० चा आकडा गाठता आला नाही.


नाथन लायन आणि मिचेल स्टार्कने प्रत्येकी तीन गडी बाद केले. तर जोश हेजलवुड आणि पॅट कमिंसने प्रत्येकी दोन गडी बाद केले. दुसरी कसोटी जिंकण्यासह ऑस्ट्रेलियाने चार कसोटी सामन्यांची मालिका १ -१ अशी बरोबरीत आणली आ. भारताने एडिलेड तर ऑस्ट्रेलियाने पर्थमधील सामन्यात दम दाखवला.


भारतीय संघ- विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव.


ऑस्ट्रेलियाचा संघ- टिम पेन (कर्णधार/ यष्टीरक्षक), एरॉन फिंच, मार्कस हैरिस, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पीटर हैंड्सकॉम्ब, ट्रेविस हेड, मिशेल स्टॉर्क, पैट कमिंस, नाथन ल्योन और जोश हेजलवुड.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 18, 2018 09:29 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...