Live Cricket Score, India vs Australia 2nd Test, 4th Day- टीब्रेकपर्यंत भारताचे दोन गडी बाद, राहुल- पुजारा तंबुत परतले

Live Cricket Score, India vs Australia 2nd Test, 4th Day- टीब्रेकपर्यंत भारताचे दोन गडी बाद, राहुल- पुजारा तंबुत परतले

भारताच्या अशा खेळामुळे पर्थचा सामना भारताला गमवावा लागणार की काय अशीच चिन्ह आता निर्माण झाली आहेत.

  • Share this:

पर्थ, १७ डिसेंबर २०१८- भारताला पर्थ कसोटी सामना जिंकण्यासाठी २८६ धावांचं लक्ष्य मिळालं असून भारताचे दोन गडीही तंबूत परतले. भारताने सहा षटकांत १५ धावा करत केएल राहुल आणि चेतेश्वर पुजारा हे दोन गडी गमावले. जोश हेजलवुडने चेतेश्वर पुजाराला अवघ्या चार धावांवर असताना यष्टीरक्षक टिम पेनकरवी झेल बाद केले. भारताने १३ धावांमध्येच दोन गडी गमावले.


भारताच्या अशा खेळामुळे पर्थचा सामना भारताला गमवावा लागणार की काय अशीच चिन्ह आता निर्माण झाली आहेत. मिचेल स्टार्कने पहिल्याच षटकात केएल राहुलला बाद करत भारताला पहिला झटका दिला. केएल राहुल शुन्यावर बाद झाला. भारतानेही धावांचं खातं सुरू उघडलं नव्हतं. भारत ०/१ अशा बिकट अवस्थेत होता.


पुन्हा एकदा टीम इंडियाचे प्रशिक्षक होणार गॅरी कर्स्टन, या खेळाडूंसोबत असेल स्पर्धा


मोहम्मद शमी (६/ ५६) आणि जसप्रीत बुमराह (३/ ३९) च्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २४३ धावांवर थांबवला. ऑस्ट्रेलियासाठी उस्मान ख्वाजाने ७२, टिम पेनने ३७ आणि एरॉन फिंचने २५ धावा केल्या. तसेच पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाकडे ४३ धावांची आघाडी होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारतासमोर २८६ धावांचं लक्ष्य उभं केलं.


Live Cricket Score, India vs Australia 2nd Test, 4th Day- ऑस्ट्रेलिया २४३ वर ऑल- आऊट, भारतासमोर २८६ धावांचं लक्ष्य


ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३२६ धावांवर संपला. भारताकडून इशांत शर्माने ४, बुमराह, उमेश यादव आणि हनुमा विहारीने प्रत्येकी २ गडी बाद केले. तर ऑस्ट्रेलियासाठी एरॉन फिंच (५०), मार्कस हॅरिस (७०) आणि ट्रॅविस हेड (५८), शॉन मार्श (४५), पेनने (३८) धावा केल्या.


 


पर्थच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी ६ गड्यांच्या मोबदल्यात २७७ धावा केल्या आहेत. पर्थच्या पिचनुसार ही धावसंख्या चांगली आहे. कारण जसा दिवस पुढे सरकेल पर्थच्या मैदानावर फलंदाजी करणं कठीण होणार आहे.


Live Cricket Score, India vs Australia 2nd Test, 4th Day- लंचनंतर ऑस्ट्रेलियाला दोन धक्के, शमीनेच घेतल्या दोन्ही विकेट, पेन- फिंच बाद


भारतीय संघ- विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव.


ऑस्ट्रेलियाचा संघ- टिम पेन (कर्णधार/ यष्टीरक्षक), एरॉन फिंच, मार्कस हैरिस, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पीटर हैंड्सकॉम्ब, ट्रेविस हेड, मिशेल स्टॉर्क, पैट कमिंस, नाथन ल्योन और जोश हेजलवुड.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 17, 2018 12:54 PM IST

ताज्या बातम्या