Live Cricket Score, India vs Australia 1st Test, 3rd Day, ऑस्ट्रेलिया २३५ ला ऑला आऊट, मात्र पुन्हा सुरू झाला पाऊस

Live Cricket Score, India vs Australia 1st Test, 3rd Day, ऑस्ट्रेलिया २३५ ला ऑला आऊट, मात्र पुन्हा सुरू झाला पाऊस

शमी जेव्हा दुसऱ्या डावात गोलंदाजी करायला येईल तेव्हा त्याच्याकडे हॅट्रीक करण्याची संधी असेल.

  • Share this:

एडिलेट, ०८ नोव्हेंबर २०१८- तिसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे थांबत थांबत सुरू होत आहे. दोन पावसाच्या ब्रेकमध्ये बुमराहने स्टार्कला बाद केले आणि त्यानंतर शमीने सलग दोन चेंडूत हेड आणि हेडलवूडला बाद करत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २३५ धावांवर संपवला.

आता शमी जेव्हा दुसऱ्या डावात गोलंदाजी करायला येईल तेव्हा त्याच्याकडे हॅट्रीक करण्याची संधी असेल. पहिल्या डावात भारताला १५ धावांची वाढ मिळाली. ऑस्ट्रेलियाकडून हेडने सर्वाधिक ७२ धावा केल्या. त्यानंतर हॅड्सकॉम्बने ३४, ख्वाजाने २८ आणि हॅरिसने २६ धावा केल्या. भारताकडून अश्विन आणि बुमराहने प्रत्येकी ३ गडी बाद केले तर इशांत आणि शमीने प्रत्येकी २ गडी बाद केले.

दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने एकून ८८ षटकांत फलंदाजी केली. यात त्यांनी ७ गडी गमावत १९१ धावा केल्या. संघासाठी ट्रेविस हेडशिवाय (नाबाद ६१) हॅड्सकॉम्बने ३४, ख्वाजाने २८ आणि हॅरिसने २६ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. ऑस्ट्रेलिया दुसऱ्या दिवशी ५९ धावांनी मागे होती.

दुसऱ्या दिवशी भारतासाठी आर. अश्विनने ऑस्ट्रेलियाचे सर्वाधिक तीन गडी बाद केले. तर इशांत आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी दोन गडी बाद केले. भारताने चेतेश्वर पुजाराच्या १२३ धावांच्या खेळीवर २५० धावांचा पल्ला गाठला. तिसरा दिवस दोन्ही संघासाठी महत्त्वपूर्ण असेल.

भारतीय संघ- मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी.

ऑस्ट्रेलियाचा संघ- मार्कस हॅरिस, एरॉन फिंच, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पीटर हैंडसकॉम्ब, ट्रेविस हेड, टिम पेन (यष्टीरक्षक / कर्णधार), पॅट कमिंस, मिशेल स्टार्क, जोश हॅजलवूड, नाथन लियोन.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 8, 2018 09:16 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading