एडिलेट, ०७ डिसेंबर २०१८- टीम इंडियाला ऑल आऊट केल्यानंतर फलंदाजी करायला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला पहिला झटका एरॉन फिंचच्या रुपात (०) बसला. पहिल्याच षटकात इशांतने फिंचला बोल्ड केले. फिंच बाद झाल्यानंतर मार्कस हॅरिस आणि उस्मान ख्वाजा यांनी मैदानात जम धरला. या जोडीला बाद करायला टीम इंडियाला फार प्रयोग करावे लागत होते. मात्र, २२ व्या षटकात आर. अश्विनच्या गोलंदाजीवर मुरली विजयने हॅरिसला झेल बाद केले. हॅरिसने ५७ चेंडूत २६ धावा केल्या होत्या.
एडिलेड कसोटीत भारताचा २५० धावा करुन ऑल आऊट झाला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा शेवटचा फलंदाज फलंदाजी करायला मैदानात उतरला. मात्र पहिल्याच चेंडूवर तो बाद झाला. हेजलवूडच्या पहिल्याच चेंडूवर मोहम्मद शमीला टिम पेनकरवी झेल बाद केले. पहिल्या डावात हेजलवूडने सर्वाधिक तीन गडी बाद केले.
एडिलेट कसोटीचा पहिला दिवस ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. ऑस्ट्रेलियाच्या जलदगती गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांच्या नाकीनऊ आणले. भारताने पहिल्या दिवशी ९ गडी गमावत २५० धावा केल्या. चेतेश्वर पुजाराने टीम इंडियाची लाज राखत आपल्या करिअरमधील १६ वे शतक साजरे केले. त्याने २४६ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह १२३ धावा केल्या.
भारतीय संघ- मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी.
ऑस्ट्रेलियाचा संघ- मार्कस हॅरिस, एरॉन फिंच, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पीटर हैंडसकॉम्ब, ट्रेविस हेड, टिम पेन (यष्टीरक्षक / कर्णधार), पॅट कमिंस, मिशेल स्टार्क, जोश हॅजलवूड, नाथन लियोन.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा