मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : तिसऱ्या आणि चौथ्या टेस्टवर कोरोनाचं संकट, होऊ शकतो मोठा बदल

IND vs AUS : तिसऱ्या आणि चौथ्या टेस्टवर कोरोनाचं संकट, होऊ शकतो मोठा बदल

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात सध्या चार टेस्ट मॅचची सीरिज सुरू आहे. सिडनी आणि ब्रिस्बेनमध्ये तिसरी आणि चौथी टेस्ट खेळवली जाईल, पण या दोन मॅचवर सध्या कोरोनाचं संकट आहे.

  • Published by:  Shreyas
ऍडलेड, 20 डिसेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात सध्या चार टेस्ट मॅचची सीरिज सुरू आहे. ऍडलेडमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा 8 विकेटने पराभव झाला. यानंतर आता दुसरी टेस्ट मॅच मेलबर्नमध्ये 26 डिसेंबरपासून सुरू होईल. यानंतर सिडनी आणि ब्रिस्बेनमध्ये तिसरी आणि चौथी टेस्ट खेळवली जाईल, पण या दोन मॅचवर सध्या कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे या दोन टेस्टची ठिकाणांची अदलाबदली होऊ शकते. सिडनीमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे नवे रुग्ण समोर यायला लागले आहेत, त्यामुळे सिडनी ते होबार्ट याच रेसही रद्द करण्यात आली आहे, त्यामुळे आथा सिडनीमध्ये होणाऱ्या तिसऱ्या टेस्टवरही संकट ओढावलं आहे, म्हणून क्रिकेट ऑस्ट्रेलिया तिसऱ्या आणि चौथ्या टेस्टच्या ठिकाणांची अदलाबदली करण्याचा विचार करत आहे. सिडनी मॉर्निंग हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार क्रिकेट ऑस्ट्रेलियाला अजूनही तिसरी टेस्ट सिडनीमध्ये होईल, अशी अपेक्षा आहे. पण तरीही त्यांनी ब्रिस्बेनला तिसऱ्या टेस्टसाठीचा पर्याय ठेवला आहे. जर तिसरी टेस्ट ब्रिस्बेनमध्ये खेळवली गेली, तर चौथी टेस्ट 15 ते 19 जानेवारीदरम्यान सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळवली जाईल. पहिल्या टेस्ट मॅचमध्ये विजय मिळवल्यामुळे ऑस्ट्रेलियाने चार टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे. सीरिजची दुसरी मॅच 26 ते 30 डिसेंबरपर्यंत मेलबर्नमध्ये, तिसरी टेस्ट 7 ते 11 जानेवारीपर्यंत आणि चौथी टेस्ट 15 ते 19 जानेवारीपर्यंत खेळवली जाईल. कोरोना व्हायरसमुळे डेव्हिड वॉर्नर आणि सीन एबॉट आधीच मेलबर्नला पोहोचले आहेत, कारण सिडनीमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत.
First published:

पुढील बातम्या