Home /News /sport /

'बाप' माणूस होणाऱ्या विराटसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं वेळापत्रकच बदललं जाणार!

'बाप' माणूस होणाऱ्या विराटसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं वेळापत्रकच बदललं जाणार!

भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli)आणि त्याची बायको अनुष्का शर्मा (Anushka Sharma)ने आयपीएल (IPL 2020) सुरू व्हायच्या आधीच त्याच्या चाहत्यांना गोड बातमी दिली.

    मुंबई, 6 ऑक्टोबर : भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli)आणि त्याची बायको अनुष्का शर्मा (Anushka Sharma)ने आयपीएल (IPL 2020) सुरू व्हायच्या आधीच त्याच्या चाहत्यांना गोड बातमी दिली. पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात घरी गोंडस बाळ येणार असल्याचं या दोघांनी जाहीर केलं. याच कारणामुळे अनुष्का शर्मा विराट कोहलीबरोबर स्पेशल चार्टर प्लेनने युएईला गेली. युएईमधूनच अनुष्का शर्मा विराटसोबत ऑस्ट्रेलियालाही जाण्याची शक्यता आहे. विराट कोहलीला अनुष्कासोबत वेळ घालवता यावा यासाठी बीसीसीआय खास तयारी करत आहे. चौथ्या टेस्टला उशीरा सुरुवात भारतीय खेळाडूंना आयपीएल संपल्यानंतर युएईवरुनच ऑस्ट्रेलियाला रवाना व्हायचं आहे. ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय टीम 4 टेस्ट, 3 वनडे आणि 3 टी-20 मॅच खेळणार आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार पहिली टेस्ट 7 जानेवारीपासून सुरू होईल. तर चौथी टेस्ट ब्रिस्बेनमध्ये खेळवली जाईल. ही टेस्ट मॅच उशीरा खेळवली जाण्याची शक्यता आहे. विराट कोहलीला अनुष्का आणि बाळासोबत वेळ मिळावा आणि त्याला मॅचमध्येही सहभागी होता यावं, यासाठी हे बदल केले जाऊ शकतात. या दौऱ्याच्या वेळापत्रकाची घोषणा अजून करण्यात आलेली नाही. ऑस्ट्रेलियात होणार बाळाचा जन्म बाळाचा जन्म जानेवारी महिन्यात होईल, असं विराट कोहलीने सांगितलं आहे. माध्यमांमध्ये येत असलेल्या वृत्तानुसार अनुष्का आणि विराटच्या बाळाचा जन्म ऑस्ट्रेलियात होईल, कारण विराट आणि अनुष्का तिकडेच असणार आहेत. मागच्यावर्षी वर्ल्ड कपदरम्यान ऑस्ट्रेलियाचा खेळाडू डेव्हिड वॉर्नर आणि त्याची पत्नी केंडिस यांच्या तिसऱ्या मुलीचा जन्मही इंग्लंडमध्ये झाला होता. कोरोना व्हायरसमुळे तयार करण्यात आलेल्या नियमांमुळे विराटला पुन्हा ऑस्ट्रेलियाला जाणं अवघड होईल. दौरा अर्धवट सोडून विराट आला तर त्याला पुन्हा ऑस्ट्रेलियात टीमसोबत येण्याआधी 14 दिवस क्वारंटाईन व्हावं लागेल, यासाठी विराट-अनुष्काच्या बाळाचा जन्म ऑस्ट्रेलियात होईल, असं सांगितलं जात आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या