IND vs AUS: कॅप्टन कोहली झाला 'सुपरमॅन', कॅमरॉन ग्रीनचा शानदार कॅच

IND vs AUS: कॅप्टन कोहली झाला 'सुपरमॅन', कॅमरॉन ग्रीनचा शानदार कॅच

कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) या शानदान कॅचमुळे कॅमरॉन ग्रीनला 11 च धावांमध्ये पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 डिसेंबर: भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये (India vs Australia) खेळल्या जात असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी (Test Match) सामन्यात भारतीय संघाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) चांगली कामगिरी करत आहे. पहिल्या डावात बॅटिंग करताना 74 धावांची शानदार खेळी करणारा विराट फिल्डिंगमध्येही आपली कमाल दाखवतो आहे. भारताचा पहिला डाव 244 धावांत संपुष्टात आला. त्यानंतर मैदानावर उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाची भारतीय गोलंदांजांनी चांगलीच दमछाक केली आहे. जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) पहिल्या टप्प्यात केलेल्या उत्तम बॉलिंगमुळे ऑस्ट्रेलियाचे सलामीचे दोन्ही बॅट्समन पॅव्हेलियनमध्ये परतले. त्यानंतर स्टार स्पिनर आर. आश्विनने (R. Ashwin) तीन विकेट घेऊन ऑस्ट्रेलियाच्या संघाचं कंबरडंच मोडलं.

पहिल्याच दिवशी टीम इंडियाने महत्त्वाच्या विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच इंडियाचे चारही बॅट्समन लवकर आउट झाले. परंतु इंडियन बॉलर्सनी पहिल्या डावात चांगली कामगिरी केली असून ऑस्ट्रलियान बॅट्समनला देखील जेरीस आणले होते. ऑस्ट्रेलियाची टीमदेखील पहिल्या इनिंगमध्ये ऑलआउट झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन टीम पेनने (Tim Paine) सर्वाधिक रन केल्या असून इतर बॅट्समन रन बनवण्यासाठी धडपडत होते.

कोहलीने घेतला उत्कृष्ट कॅच

मॅचच्या 41व्या ओव्हरमध्ये आर. आश्विन बॉलिंग करायला आला. ऑस्ट्रेलियाकडून पहिलीच कसोटी खेळणारा कॅमरॉन ग्रीन बॅटिंग करत होता. ग्रीनने आश्विनच्या बॉलला मिडविकेटला पुल शॉट मारला. तिथं विराट कोहलीने एकदम शानदार डाइव्ह मारून त्याचा कॅच घेतला. त्यामुळे ग्रीनला केवळ 11 धावांवरच समाधान मानून तंबूत परतावं लागलं.

भारताचा डाव 244 धावांत आटोपला

त्यापूर्वी आज सकाळी भारताचा पहिला डाव केवळ 244 धावांवर आटोपला. मिशेल स्टॉर्कने 53 धावा देऊन चार, तर पॅट कमिन्सने 48 धावा देऊन तीन बळी घेतले. भारताचे शेवटचे चार बॅट्समन कालच्या धावसंख्येत केवळ 11 धावांची भर घालून तंबूत परतले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा भारताने सहा बळींच्या बदल्यात 233 धावा केल्या होत्या.

(हे वाचा-IND vs AUS : टेस्ट क्रिकेटमध्ये लाल नाही गुलाबी बॉलच वापरा!)

एक वेळ अशी होती, की भारताचा धावफलक तीन गडी बाद 188 असा होता. मात्र कॅप्टन विराट कोहली रनआउट (Run Out) झाल्यानंतर मात्र भारताचा डाव कोसळला. अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) एक रन घेण्याच्या चुकीच्या निर्णयामुळे कोहली आउट झाला. आज सकाळी रविचंद्रन आश्विनला पहिल्याच ओव्हरमध्ये कमिन्सने आउट केलं. आश्विनने केवळ 15 धावा केल्या. नऊ धावा करणाऱ्या साहाचा बळी स्टॉर्कने घेतला. उमेश यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी एक-एक चौकार मारून आव्हान वाढवण्याचा प्रयत्न केला; मात्र ते लवकर आउट झाले.

Published by: Janhavi Bhatkar
First published: December 18, 2020, 7:47 PM IST

ताज्या बातम्या