IND vs AUS : दुसऱ्या टेस्टमध्ये मुलाग यांच्या नावाने मॅन ऑफ द मॅच, जाणून घ्या कोण आहेत मुलाग

IND vs AUS : दुसऱ्या टेस्टमध्ये मुलाग यांच्या नावाने मॅन ऑफ द मॅच, जाणून घ्या कोण आहेत मुलाग

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात 26 डिसेंबरपासून दुसऱ्या टेस्ट मॅचला सुरूवात होणार आहे.

  • Share this:

मेलबर्न, 21 डिसेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात 26 डिसेंबरपासून दुसऱ्या टेस्ट मॅचला सुरूवात होणार आहे. या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये ऑस्ट्रेलिया विजय मिळवून सीरिजमध्ये आणखी मजबूत स्थितीमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करेल, तर टीम इंडियापुढे पुनरागमनाचं आव्हान असेल. पहिल्या मॅचमध्ये भारताचा 8 विकेटने पराभव झाला होता.

बॉक्सिंग डे टेस्टमध्ये मॅन ऑफ द मॅच मिळवण्याऱ्या खेळाडूला मुलाग पदक देऊन सन्मानित केलं जाणार आहे. जॉनी मुलाग हे परदेश दौऱ्यावर जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या टीमचे पहिले कर्णधार होते. मुलाग यांच्या नेतृत्वात 1868 साली ऑस्ट्रेलियाच्या टीमने इंग्लंडचा दौरा केला होता. जॉन मुलाग ऑलराऊंडर होते. बॉक्सिंग डे टेस्टमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला मुलाग पदक देऊन सन्मानित केलं जाईल, असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितलं आहे.

मुलाग यांचं खरं नाव उनारिमिन होतं, त्यांनी 45 मध्ये 23 च्या सरासरीने 71 इनिंगमध्ये 1,698 रन केले होते. तसंच त्यांनी 1,877 ओव्हरही टाकल्या होत्या, यातल्या 831 ओव्हर मेडन होत्या. मुलाग यांनी 10 च्या सरासरीने 257 विकेटही घेतल्या होत्या. मुलाग यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये कामचलाऊ विकेट कीपरची भूमिकाही निभावली आणि चार स्टम्पिंग केले. 1866 साली मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये मुलाग खेळले होते.

Published by: Shreyas
First published: December 21, 2020, 2:49 PM IST
Tags:

ताज्या बातम्या