IND vs AUS : टीम इंडियाच्या खेळाडूंची मुलींसोबत ऑस्ट्रेलियात भ्रमंती

IND vs AUS : टीम इंडियाच्या खेळाडूंची मुलींसोबत ऑस्ट्रेलियात भ्रमंती

टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया (India vs Australia) दौऱ्याची सुरुवात अत्यंत खराब झाली. पहिल्या दोन्ही वनडेमध्ये मोठा पराभव झाल्यामुळे भारताला सीरिज गमवावी लागली आहे.

  • Share this:

सिडनी, 1 डिसेंबर : टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात अत्यंत खराब झाली. पहिल्या दोन्ही वनडेमध्ये मोठा पराभव झाल्यामुळे भारताला सीरिज गमवावी लागली आहे. पहिल्या वनडेमध्ये भारताचा 66 रननी तर दुसऱ्या वनडेमध्ये 51 रनने भारताचा पराभव झाला. आता तिसऱ्या वनडेमध्ये विजय मिळवून व्हाईट-वॉशची नामुष्की टाळण्याचा भारताचा प्रयत्न असेल. वनडे सीरिज संपल्यानंतर तीन मॅचची टी-20 सीरिज खेळवण्यात येणार आहे. तर टी-20 सीरिजनंतर चार टेस्ट मॅचची सीरिज होईल. 17 डिसेंबरपासून ऍडलेडमध्ये टेस्ट सीरिजला सुरुवात होईल. टेस्ट सीरिजआधी खेळाडू आपल्या मुलांसोबत वेळ घालवत आहेत.

टेस्ट टीममध्ये निवड झालेले आर.अश्विन (R.Ashwin), चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) त्यांच्या मुलींसोबत फिरायला बाहेर गेले होते. याचे काही फोटोही त्यांनी शेयर केले आहेत. फादर्स डे आऊट विथ बेबीज, असं म्हणत अश्विनने हे फोटो शेयर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Ashwin (@rashwin99)

भारताने मागची टेस्ट सीरिज न्यूझीलंडमध्ये याच वर्षाच्या सुरुवातीला खेळली होती. त्या दोन्ही टेस्ट मॅचमध्ये भारताचा पराभव झाला होता. टेस्ट टीमचे हे तिन्ही खेळाडू आता ऑस्ट्रेलियात पुन्हा एकदा मैदानात उतरतील. कोरोना व्हायरसमुळे भारतातील क्रिकेटला ब्रेक लागला होता.

टेस्ट सीरिजमधली पहिली टेस्ट खेळल्यानंतर कर्णधार विराट कोहली भारतात परतणार आहे. विराटच्या अनुपस्थितीमध्ये उपकर्णधार म्हणून रहाणेकडे उरलेल्या तीन मॅचसाठी टीमचं नेतृत्व जाईल, त्यामुळे रहाणेसोबतच या दोन्ही टेस्ट खेळाडूंच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असणार आहे.

2018-19 साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या टेस्ट सीरिजमध्ये भारताचा विजय झाला होता. ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच टेस्ट सीरिज जिंकून भारताने इतिहास घडवला होता. विराटही ऑस्ट्रेलियात विजय मिळवणारा पहिला आशियाई कर्णधार होता. त्या सीरिजमध्ये पुजाराने चार मॅचमध्ये 521 रन केले होते.

Published by: Shreyas
First published: December 1, 2020, 3:47 PM IST
Tags:

ताज्या बातम्या