IND vs AUS : दुसऱ्या टेस्टसाठी टीम इंडियात मोठे बदल, रहाणे यांना संधी देणार!

IND vs AUS : दुसऱ्या टेस्टसाठी टीम इंडियात मोठे बदल, रहाणे यांना संधी देणार!

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा (India vs Australia) 8 विकेटने मानहानीकारक पराभव झाला. त्यामुळे दुसऱ्या टेस्टसाठी टीममध्ये मोठे बदल होणार, हे निश्चित मानलं जात आहे. 26 डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये दुसऱ्या टेस्टला सुरुवात होणार आहे.

  • Share this:

मेलबर्न, 20 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा (India vs Australia) 8 विकेटने मानहानीकारक पराभव झाला. दुसऱ्या इनिंगमध्ये भारताचा डाव फक्त 36 रनवर संपुष्टात आला. टेस्ट क्रिकेटमधला भारताचा हा निच्चांकी स्कोअर आहे. या इनिंगमध्ये भारताच्या एकही खेळाडूला दोन आकडी धावसंख्या गाठता आली नाही, त्यामुळे दुसऱ्या टेस्टसाठी टीममध्ये मोठे बदल होणार, हे निश्चित मानलं जात आहे. 26 डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये दुसऱ्या टेस्टला सुरुवात होणार आहे.

विराटची अनुपस्थिती

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) भारतात परतणार आहे. विराटची पत्नी अनुष्का शर्मा बाळाला जन्म देणार असल्यामुळे विराट हा दौरा अर्धवट सोडणार आहे. त्यामुळे दुसऱ्या टेस्टपासून अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) कडे टीमचं नेतृत्व असेल.

पृथ्वीला डच्चू, गिल-राहुलला संधी

पहिल्या टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये भारताचा ओपनर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) अपयशी ठरला. आयपीएलपासूनच पृथ्वी शॉ मैदानात संघर्ष करताना दिसत आहे. ऑस्ट्रेलिया ए विरुद्धच्या सराव सामन्यातही त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. ऍडलेडमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये पृथ्वी शॉ याला दोन्ही इनिंग मिळून फक्त 6 बॉल खेळता आले, या दोन्ही इनिंगमध्ये तो बोल्ड झाला. पहिल्या इनिंगमध्ये दुसऱ्या बॉलवर शून्य रन करून तर दुसऱ्या इनिंगमध्ये 4 रन करून शॉ माघारी परतला.

पृथ्वी शॉ याला बाहेर ठेवून शुभमन गिल (Shubhaman Gill) याला तर विराटच्या अनुपस्थितीमध्ये केएल राहुल (KL Rahul) टीममध्ये दिसतील, अशी शक्यता आहे.

ऋषभ पंत दिसणार?

पहिल्या टेस्ट मॅचमध्ये खेळलेला ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) यानेही निराशाजनक कामगिरी केली. ऋद्धीमान साहा याने खेळलेल्या खराब शॉटवरही टीका करण्यात आली, तसंच त्याने कॅचही सोडले, त्यामुळे दुसऱ्या टेस्टसाठी ऋषभ पंत (Rishabh Pant) याला संधी मिळू शकते. ऋषभ पंतला टीममध्ये घेतल्यामुळे बॅटिंग मजबूत होते, तसंच सराव सामन्यातही पंत याने वादळी शतक केलं होतं.

मोहम्मद शमीऐवजी कोण?

पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना पॅट कमिन्सचा बाऊन्सर मोहम्मद शमी (Mohammad Shami) च्या हाताला लागला, त्यामुळे शमी मैदान सोडून गेला. या दुखापतीमुळे मोहम्मद शमी या टेस्ट सीरिजमधून बाहेर झाला आहे. त्याच्याऐवजी नवदीप सैनी किंवा मोहम्मद सिराज यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते.

Published by: Shreyas
First published: December 20, 2020, 12:57 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading