सिडनी, ०४ जानेवारी २०१९- चेतेश्वर पुजाराने संयम आणि धैर्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांपैकी तीन सामन्यात शतकी खेळी खेळली. एवढंच नाही तर पुजाराने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांच्या नाकीनऊही आणले. याचा पुरावा तेव्हा मिळाला जेव्हा ऑस्ट्रेलियाचा या मालिकेतील सर्वात यशस्वी गोलंदाज नाथन लायनने पुजाराला वैतागून विचारलं की, ‘तू फलंदाजी करता करता कंटाळत नाहीस का? ’ नाथनने हा प्रश्न सिडनी येथे सुरू असलेल्या चौथ्या सामन्यात विचारला. लायनच्या या प्रश्नावर पुजाराने कोणतंही उत्तर दिलं नाही तो फक्त मिश्किलपणे हसला.
नाथन आणि पुजारामधील या संभाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर कमालिचा व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर भारतीय क्रिकेट प्रेमींनीन ऑस्ट्रेलियाच्या संघाची मस्करी करायला सुरुवात केली.
सिडनी कसोटी सामन्याच्या पहिल्या सत्रात पुजाराने १९३ धावा केल्या. तो अवघ्या सात धावांनी द्विशतकाला मुकला. करिअरमध्ये पहिल्यांदा तो द्विशतकी खेळी खेळणार होता. पुजाराने द्विशतकी खेळी खेळली नसली तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत सर्वात जास्त चेंडू खेळण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर झाला आहे. पुजाराने द्रविडच्या १२०३ चेंडू खेळण्याच्या रेकॉर्डला मागे टाकले आहे.
जागतिक रेकॉर्डबद्दल बोलायचे झाले तर ऑस्ट्रेलियात सर्वात जास्त चेंडू खेळण्याचा रेकॉर्ड एलिस्टर कुकच्या नावावर आहे. पुजाराने डेसमेंड हेंसला याबाबतीत मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे. पुजारा आतापर्यंत मैदानात १८६८ मिनिटं टिकून राहिला आहे. सर्व परदेश दौऱ्याबद्दल बोलायचे झाले तर आजही सुनील गावस्कर यांच्यानाववरच हा रेकॉर्ड आहे. १९७१ मध्ये गावस्कर यांनी विंडीजविरोधात १९७८ मिनिटं फलंदाजी केली होती.
VIDEO : ऑस्ट्रेलियात इतिहास घडवण्याआधी विराट आणि टीम इंडियाचा हटके अंदाज