'...तर धोनीच्या आधी विराटच ऋषभ पंतला रिटायर करेल'

'...तर धोनीच्या आधी विराटच ऋषभ पंतला रिटायर करेल'

ऋषभ पंतच्या कामगिरीमुळे सोशल मीडियावर युझर्सनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 मार्च: एखाद्या संघाने वनडेत 358 धावा केल्यानंतर देखील त्यांचा पराभव होत असेल तर त्या संघातील खेळाडूंनी नक्कीच मोठ्या चुका केल्या असतील असे समजण्यास हरकत नाही. भारतीय संघाने मोहालीत झालेला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना याच कारणामुळे गमावला. क्षेत्ररक्षण करताना भारतीय खेळाडूंनी अनेक कॅच सोडले. याचा फायदा ऑस्ट्रेलियाला झाला आणि त्यांनी 4 गडी राखून विजय मिळवला.

भारतीय संघात महेंद्रसिंग धोनीचा उत्तराधिकारी म्हणून ज्याकडे पाहिले जाते त्या ऋषभ पंतने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात खराब कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीमुळे सोशल मीडियावर युझर्सनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

अनेक नेटिझन्सच्या मते पंतने खराब विकेटकिपिंग कशी करावी याचे उत्तम उदाहरण दिले आहे. धोनीपेक्षा 16 वर्षांनी लहान असेल्या ऋषभचे किपिंग देखील 16 टक्क्यांनी स्लो आहे, असे देखील एका युझरने म्हटले आहे. तर दुसऱ्या एकाने ऋषभ जर अशीच कामगिरी करत राहिला तर धोनीच्या आधी विराटच त्याला रिटायर करेल.

कुठे चुकला ऋषभ

ऋषभ पंतने केलेल्या चुकांमुळे भारताने सामना गमवला असे म्हणण्यास हरकत नाही. अॅश्टन टर्नर याला बाद करण्याची सुवर्णसंधी पंतला मिळाली होती. पण त्याने ती गमावली. त्यानंतर टर्नरने 43 चेंडूत नाबाद 84 धावांची वादळी खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यातील विजयामुळे ऑस्ट्रेलियाने मालिकेत 2-2 अशी बरोबरी केली. त्यामुळे मालिका कोणाची याचा निर्णय दिल्लीत 13 मार्च रोजी होणाऱ्या सामन्यात होईल.

माथाडी कामगारांना उदयनराजेंनी दिलं हे आश्वासन, UNCUT भाषण

First published: March 11, 2019, 10:49 PM IST

ताज्या बातम्या