‘लेडी लक’ने बदललं नशीब, पहिल्याच सामन्यात ठोकले अर्धशतक

मयंकच्या लग्नात केएल राहुल वराती म्हणून गेला होता. मात्र आता मयंकने तिसऱ्या कसोटी सामन्यात केएल राहुलचीच जागा घेतली आहे.

  • Share this:

भारत आणि ऑस्ट्रेलिया सध्या कसोटी मालिकेत १ -१ सामना जिंकत बरोबरीत आहेत. तिसरा सामना ऐतिहासिक बॉक्सिंग- डे कसोटी सामना म्हणून कायम लक्षात ठेवला जाईल.

या सामन्यासाठी भारतीय संघ तयार असल्याचा दिसून येत आहे. म्हणूनच सामन्याच्या एक दिवसआधीच संघाने त्यांच्या ११ खेळाडूंची यादी जाहीर केली.

तिसऱ्या कसोटी सामन्यात मयंक अगरवालला पदार्पणाचा सामना खेळण्याची संधी देण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून मयंकने स्थानिक क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा दबदबा बनवला आहे.

अखेर त्याला मेहनतीचं फळ मिळालं आणि भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली. मयंक अग्रवालच्या फारशा माहीत नसलेल्या गोष्टी आज जाणून घेऊ...

युवा सलामीवीर पृथ्वी शॉ दुखापतग्रस्त असल्यामुळे मयंक अगरवालला भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली. स्थानिक क्रिकेटमध्ये मयंकच्या नावाला चांगलंच वलय आहे.

मयंक कर्नाटकमधून स्थानिक क्रिकेट खेळतो. याशिवाय इंडिया ‘ए’साठीही तो फलंदाजी करतो. इंडिया ‘ए’साठी केलेल्या उत्तम कामगिरीमुळे त्याला टीम इंडियात खेळण्याची संधी मिळाली.

मयंक अग्रवालचं नशीब त्याच्या दमदार कामगिरीमुळे जेवढं उजळलं तेवढंच लग्नामुळेही उजळलं. मयंकने सहा महिन्यांपूर्वी त्याची लहानपणीची मैत्रीण आशिताशी लग्न केले. लग्नाच्या अवघ्या काही महिन्यातच त्याला लॉटरी लागली आणि टीम इंडियाकडून आता तो पदार्पण करत आहे.

मयंकने आशिताला थेम्स नदी जवळ असलेल्या लंडन आयमध्ये लग्नाची मागणी घातली होती. त्याची ही मागणी आशिता नाकारू शकली नाही.

४ जून २०१८ ला मयंक आणि आशिताचं लग्न झालं. विशेष म्हणजे या दोघांच्या लग्नात केएल राहुल वराती म्हणून गेला होता. आता मयंकने तिसऱ्या कसोटी सामन्यात केएल राहुलची जागा घेतली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 25, 2018 12:46 PM IST

ताज्या बातम्या