अॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL

अॅडिलेडमध्ये रवींद्र जडेजाने उडवली ऑस्ट्रेलियाची झोप, VIDEO VIRAL

ऑस्ट्रेलियाने भारताला ५० षटकांत २९९ धावांचं लक्ष्य दिलं होतं. भारताने ६ गडी राखत ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला.

  • Share this:

अॅडिलेड, १५ जानेवारी २०१९- टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला जगातला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक मानले जाते. तो सर्वोत्कृष्ट का आहे याचं नुकतच त्याने एक उदाहरण दाखवलं. एडिलेड येथील एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी उस्मान ख्वाजा फलंदाजी करत होता.

उस्मान टीम इंडियाला डोईजड होईल असं वाटत असतानाच १९ व्या षटकात रवींद्र जडेजाने अचूक फेकीवर ख्वाजाला धावबाद केलं. ख्वाजाने कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र रवींद्रने वेगाने धावत पॉइंटवरुन एका हाताने चेंडू फेकला जो सरळ स्टंपवर जाऊन आदळला.

रवींद्र जडेजाच्या या अफलातून क्षेत्ररक्षणाने साऱ्यांनाच वेड लावलं. फक्त भारतीयच नाही तर ऑस्ट्रेलियाचे चाहतेही जडेजाच्या क्षेत्ररक्षणाचे चाहते झाले. जडेजाने फक्त क्षेत्ररक्षणानेच नाही तर गोलंदाजीनेही साऱ्यांची मनं जिंकली. त्याने पीटर हँड्सकॉम्बला २० धावांवर बाद केले. तर शतकवीर शॉन मार्शचा झेलही पकडला.Loading...
ऑस्ट्रेलियाने भारताला ५० षटकांत २९९ धावांचं लक्ष्य दिलं होतं. भारताने ६ गडी राखत ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. भारतासाठी कर्णधार विराट कोहलीने १०४, धोनीने ५५ आणि रोहित शर्माने ४३ धावा केल्या. भुवनेश्वर कुमारने १० षटकांत ४५ धावा देत ४ गडी बाद केले.


VIDEO : एका चेंडूत हव्या होत्या 6 धावा, तरीही 1 चेंडू राखून जिंकला सामना


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 15, 2019 06:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...