IND vs AUS : विराटविरुद्ध ऑस्ट्रेलियाची रणनीती, 5 वेळा फसला आहे भारताचा कर्णधार

IND vs AUS : विराटविरुद्ध ऑस्ट्रेलियाची रणनीती, 5 वेळा फसला आहे भारताचा कर्णधार

टीम इंडिया (Team India) च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला 27 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या या रणनीतीमध्ये विराट कोहली (Virat Kohli) पाचवेळा फसला आहे.

  • Share this:

सिडनी : टीम इंडिया (Team India) च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला 27 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. यासाठी दोन्ही टीमकडून जोरदार तयारी सुरू आहे. मागच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या वनडे सीरिजमध्ये भारताचा विजय झाला होता, त्यावेळी विराट कोहली (Virat Kohli) आणि एमएस धोनी (MS Dhoni) भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यामुळे आता संपूर्ण जबाबदारी विराट कोहलीवर आहे, त्यामुळे ऑस्ट्रेलियाही विराटलाच लक्ष्य करण्याच्या तयारीत आहे. यासाठी ऑस्ट्रेलियाच्या टीमने रणनीतीही आखली आहे. या रणनीतीमध्ये विराट पाचवेळा फसला आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये विराट कोहलीने खोऱ्याने रन केले आहेत. ऑस्ट्रेलियात विराटची वनडे सरासरी 50.17 आहे. त्याने 26 इनिंगमध्ये 1,154 रन केले आहेत, यात 5 शतकं आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे. पण विराटला ऑस्ट्रेलियाच्या एडम झम्पा (Adam Zampa)कडून जास्त धोका आहे. वनडे क्रिकेटमध्ये एडम झम्पाने विराटला सर्वाधिक 5 वेळा आऊट केलं आहे.

एडम झम्पाने विराटला 148 बॉल टाकले, यात विराटने 174 रन केले, यामध्ये विराट पाच वेळा आऊट झाला. भारतात झालेल्या 3 मॅचच्या सीरिजमध्ये झम्पाने 2 वेळा विराटची विकेट घेतली. तर टी-20 क्रिकेटमध्येही झम्पाने 2 वेळा विराटला माघारी धाडलं. पण लेग स्पिनरच्याविरुद्ध विराटने 109.25 च्या स्ट्राईक रेटने आणि 60 च्या सरासरीने रन केल्या आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या वनडे सीरिजला 27 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. दुसरी वनडे 29 नोव्हेंबर आणि तिसरी वनडे 2 डिसेंबरला होईल. तर 4 डिसेंबरपासून टी-20 सीरिज सुरू होईल. दुसरी टी-20 6 डिसेंबर आणि तिसरी टी-20 मॅच 8 डिसेंबरला होईल. 17 डिसेंबरपासून चार टेस्ट मॅचची सीरिज सुरू होईल. पहिली टेस्ट झाल्यानंतर विराट भारतात परतणार आहे. पत्नी अनुष्का शर्मा बाळाला जन्म देणार असल्यामुळे विराट दौरा अर्धवट सोडणार आहे.

Published by: Shreyas
First published: November 21, 2020, 6:53 PM IST
Tags:

ताज्या बातम्या