Video- उस्मान ख्वाजाने अप्रतिम कॅच घेत कोहलीचा पाठवले तंबूत

Video- उस्मान ख्वाजाने अप्रतिम कॅच घेत कोहलीचा पाठवले तंबूत

उस्मानची लवचिकता पाहून तिथे उपस्थित सारेच अवाक झाले.

  • Share this:

एडिलेड, ०६ डिसेंबर २०१८- पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवशी धावांचा डोंगर उभारु अशी कोहलीला अपेक्षा होती. मात्र त्याने जसं ठरवलं तसं काहीच होताना दिसत नाही. दुसऱ्या षटकापासून भारताच्या विकेट पडायला सुरुवात झाली.

ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी सातत्याने ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकत भारतीय फलंदाजांना सतावत विकेट टाकायला भाग पाडले. विराट कोहलीला पॅट कमिंसने आपल्या पहिल्याच षटकात बाद केले. गलीमध्ये उस्मान ख्वाजाने एका हाताने त्याची कॅच पकडली. उस्मानची लवचिकता पाहून तिथे उपस्थित सारेच अवाक झाले. उस्मानने कोहलीला ड्राइव्ह घेताना दिसले तेव्हा त्याने लगेच डाव्या बाजूला उडी घेतली आणि एका हाताने जबरदस्त कॅच पकडला. विराटची विकेट ऑस्ट्रेलियाला जिंकवू शकते. त्यामुळेच उस्मान ख्वाजाच्या या कॅचची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.

७० वर्षात पहिल्यांदा सीरिज जिंकणं हे भारताचं लक्ष्य असणार आहे. आतापर्यंत भारताने परदेशात फार आश्वासक कामगिरी केलेली नाही. इतिहासाची पुनरावृत्ती न करण्याचाच कोहलीच्या संघाचा प्रयत्न असेल. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये सीरिज गमावल्यानंतर जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक कोहलीसाठी ही सीरिज फार महत्त्वाची आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ अनुभवी नसल्यामुळे त्याचा फायदा टीम इंडियाला घेता येईल. ऑस्ट्रेलियाच्या जमिनीवर भारतने आतापर्यंत ४४ कसोटी सामने खेळले असून त्यातील फक्त ५ सामने जिंकले आहेत.

भारतीय संघ- मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी.

ऑस्ट्रेलियाचा संघ- मार्कस हॅरिस, एरॉन फिंच, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पीटर हैंडसकॉम्ब, ट्रेविस हेड, टिम पेन (यष्टीरक्षक / कर्णधार), पॅट कमिंस, मिशेल स्टार्क, जोश हॅजलवुड, नाथन लियोन.

First published: December 6, 2018, 10:03 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading