News18 Lokmat

India vs Australia- अन् अचानक विराट कोहली मैदानातच नाचायला लागला

विराट कोहलीचा कोणताही व्हिडिओ अवघ्या काही सेकंदात सोशल मीडियावर व्हायरल होतो.

News18 Lokmat | Updated On: Dec 10, 2018 02:46 PM IST

India vs Australia- अन् अचानक विराट कोहली मैदानातच नाचायला लागला

एडिलेट, १० डिसेंबर २०१८-विराट कोहलीला जेव्हाही संधी मिळते तो नाचायची एकही संधी सोडत नाही. एडिलेड कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी असंच काही दिसलं. कोहली जेव्हा क्षेत्ररक्षण करत होता तेव्हा तो स्वतःचं करमणूक करण्यासाठी चक्क एकटाच नाचायला लागला.

क्रिकेट डॉट कॉम डॉट एयू या सोशल मीडिया अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. मैदानावरील कोहलीचा हा अंदाज अनेकांना चांगलाच आवडत आहे.

वेगवेगळी गाणी बँकग्राऊंडला लावून हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात प्रामुख्याने विराट पुणेरी ढोल आणि पंजाबी भांगड्यावर नाचताना दाखवण्यात आले आहे. विराट कोहलीचा कोणताही व्हिडिओ अवघ्या काही सेकंदात सोशल मीडियावर व्हायरल होतो.

भारताने ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवत चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे. आर, अश्निनने हेजलवूडला बाद करत भारतासाठी विजय सुकर करुन दिला. भारतासाठी जसप्रीत बुमराह, आर. अश्विन आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी ३ गडी बाद केले. तर इशांत शर्माने १ गडी बाद केला.
ऑस्ट्रेलियासाठी फलंदाज शॉन मार्शने सर्वाधिक ६० धावा केल्या. मार्शशिवाय कोणत्याही फलंदाजाने ४० च्या पुढे धावा केल्या नाहीत. भारतासाठी चेतेश्वर पुजाराने महत्त्वपूर्ण कामगिरी केली. पहिल्या डावात १२३ धावा तर दुसऱ्या डावात ७१ धावा करुन भारतासाठी धावांचा डोंगर उभा करण्यास महत्त्वाची भूमिका बजावली. मॅन ऑफ दी मॅच म्हणून त्याचा गौरवही करण्यात आला.


भारताने आज ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्याने एक इतिहास रचला आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात तब्बल १० वर्षांपूर्वी धूळ चारली होती. २००८ मध्ये झालेल्या पर्थ कसोटीत भारताने विजय मिळवला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्यापासूनच मजबूत पकड निर्माण केली आहे. या विजयासोबत कोहली इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामना जिंकणारा पहिला आशियाई कर्णधार ठरला.


VIDEO : असा 'क्रिकेट डान्स' तुम्ही कधी पाहिलाच नसेल


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 10, 2018 02:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...