ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विराटचं ‘सर्वस्व’ पणाला, हरला तर ‘खुर्ची’ही जाईल

६ डिसेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धची ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार आहे.

  • Share this:

६ डिसेंबरपासून सुरू होणार ऑस्ट्रेलियाविरुद्धची ४ सामन्यांची कसोटी मालिका विराटसाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. या मालिकेवरच त्याचा कर्णधारपदाचा आणि टीम इंडियाची शान अवलंबून आहे. यासोबतच ही कसोटी मालिका टीम इंडिया कसोटीच्या क्रमवारीत अग्रणी राहणार की नाही हेही ठरवणार आहे.

आयसीसीच्या टेस्ट रँकिंगनुसार, भारतीय संघ यावेळी ११६ अंकांनी पहिल्या स्थानावर आहे. तर १०८ अंकांनी इंग्लंडचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका १०६ अंकांनी तिसऱ्या, न्युझीलँड १०२ अंकांनी चौथ्या आणि १०२ अंकांनी ऑस्ट्रेलिया संघ पाचव्या स्थानावर आहे.

ही मालिका भारत हरला तर भारत टेस्ट रँकिंगमध्ये सरळ तिसऱ्या स्थानावर कसा फेकला जाईल हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत ही मालिका ०-४ ने हरली आणि दक्षिण आफ्रिकाने २६डिसेंबरपासून त्यांच्या मायदेशात सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत पाकिस्तानला ३-० ने हरवले तर भारताची कसोटी रँकिंगमध्ये घसरण होईल.

या परिस्थिती दक्षिण आफ्रिका नंबर १ चा कसोटी संघ होईल. तर भारताला ४-० ने हरवल्यानंतर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर जाईल. तर इंग्लंडची तिसऱ्या स्थानावर घसरण होईल. तर भारत इंग्लंडहून खाली येत चौथ्या स्थानावर येईल.

ऑस्ट्रेलियाचा संघ कमकूवत जरी असला तरी भारताने परदेशात कधीच फार चांगलं प्रदर्शन केलेलं नाही. यासाठी जुना इतिहास साक्ष आहेच.

टीम इंडियाला दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. अशात ऑस्ट्रेलियाच्या जमिनीवर पराभवाची पुनरावृत्तीही होऊ शकते. मात्र असं असलं तरी वर्षभरात टीम इंडियाला पहिल्या स्थानावरून कोणीही हटवू शकलेलं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 29, 2018 05:05 PM IST

ताज्या बातम्या