Home /News /sport /

IND vs AUS : नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा क्षेत्ररणाचा निर्णय, टीम इंडियाचे हे 11 खेळाडू मैदानात

IND vs AUS : नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा क्षेत्ररणाचा निर्णय, टीम इंडियाचे हे 11 खेळाडू मैदानात

गेल्यावेळी झालेल्या भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेत भारताला 2-3 ने पराभव पत्करावा लागला होता.

    मुंबई, 14 जानेवारी : दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज आणि लंकेला पराभूत केल्यानंतर टीम इंडिया आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरणार आहे. ऑस्ट्रेलियाने त्यांचा मजबूत असा संघ भारताविरुद्ध सज्ज केला आहे. स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, अॅरॉन फिंच, मार्नस लब्युशेन, स्टार्क, कमिन्स हे खेळाडू संघात असणार आहेत. वर्ल्ड कपनंतर पहिल्यांदाच दोन्ही संघ एकदिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने आले आहेत. वानखेडेवर हा सामना सुरु होणार आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लब्युशेन एकदिवसीय क्रिकटेमध्ये पदार्पण करणार आहे. ऑस्ट्रेलियाचा तो 229 वा एकदिवसीय क्रिकेट खेळणारा खेळाडू बनला आहे. त्याने कसोटीमध्ये धमाकेदार कामगिरी केली आहे. आता तो एकदिवसीय क्रिकेट गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघ गेल्या मालिकेतील पराभवाचा बदला घेण्यास उत्सुक असेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी गेल्या काही मालिकांमध्ये सातत्याने विजय मिळवला आहे. त्यामुळे ही परंपरा कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. गेल्यावेळी झालेल्या भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेत भारताला 2-3 ने पराभव पत्करावा लागला होता. वानखेडेवर दिसणार रोहित-विराटचा जलवा! मोडू शकतात तब्बल 4 रेकॉर्ड भारताची आघाडीची फळी आणखी मजबूत झाली आहे. रोहित शर्मा विश्रांतीनंतर पुन्हा परतला असून शिखर धवनही पुनरागमन करत आहे. केएल राहुल, विराट कोहली फॉर्ममध्ये असून फलंदाजीची मदार या खेळाडूंवर असेल. भारताचा संघ : शिखर धवन, रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह. ऑस्ट्रेलिया संघ : डेविड वॉर्नर, अॅरोन फिंच, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, अॅश्‍टन टर्नर, अलेक्स कॅरी, अॅश्टन अॅगर, पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, केन रिचर्डसन, अॅडम झाम्‍पा​ आगीत होरपळलेल्या ऑस्ट्रेलियासाठी सचिन-धोनी घेणार पुढाकार! वाचून तुम्ही कराल सलाम
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या