एकटा विराट पाकच्या 32 खेळाडूंवर भारी, मिळतं एवढं वेतन!

ICC Cricket World Cup 2019 : BCCI विराटला जितकं वेतन वर्षाला देते तेवढं तर पाकिस्तानच्या संपूर्ण संघाला मिळत नाही.

News18 Lokmat | Updated On: Jun 18, 2019 09:08 PM IST

एकटा विराट पाकच्या 32 खेळाडूंवर भारी, मिळतं एवढं वेतन!

ICC Cricket World Cup स्पर्धेत भारताने पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर पाकच्या खेळाडूंवर चाहत्यांनी खूप टीका करायला सुरूवत केली आहे. संघात गट पडल्याचं पाकिस्तानी माध्यमांनी म्हटलं आहे.

चाहत्यांच्या रागाची कर्णधार सर्फराज अहमदने इतकी धास्ती घेतली आहे की, मी एकटा पाकिस्तानला जाणार नाही. संपूर्ण देशातील लोकांसमोर आपण सर्वांनी जायचं असंच त्याने सहकारी खेळाडूंना बजावलं आहे.

दरम्यान, आता पाकिस्तानी खेळाडूंच्या वेतनाची चर्चा जोरात सुरू आहे. भारीतीय खेळाडूंना ज्याप्रमाणे बीसीसीआय वेतन देतं तसंच पाकिस्तानी खेळाडूंनी पीसीबीकडून वेतन दिलं जातं. त्यांचेही ग्रेडनुसार वेतन ठरतं.

भारताचा कर्णधार विराट कोहली ए ग्रेडमध्ये असून त्याला वर्षाला सात कोटी रुपये दिले जातात. तर पाकिस्तानच्या सर्व खेळाडूंचे वेतन मिळून 7 कोटी 53 लाख रुपये आहे.

पाकिस्तानच्या 6 खेळाडूंचा समावेश ए ग्रेडमध्ये आहे. त्यांना वर्षाला 48 लाख रुपये वेतन दिलं जातं.

बी ग्रेडमधील खेळाडूंना 30 लाख रुपये वर्षाला मिळतात. त्यात पाकच्या 6 खेळाडूंचा समावेश आहे.

पाकिस्तानमध्ये सी ग्रेड खेळाडूंना 21 लाख रुपये वेतन वर्षाला दिलं जातं. यात 9 खेळाडू आहेत.

डी ग्रेडमध्ये 5 खेळाडू असून पाकिस्तान क्रिकेट बोर्ड त्यांना 12 लाख रुपये वेतन देतं.

पाकिस्तानच्या इ ग्रेडमधील खेळाडूंना वर्षाला 6 लाख रुपये दिले जातात. इ ग्रेडमध्ये पाकचे 6 खेळाडू आहेत.

बीसीसीआयने जाहीर केलेल्या वार्षिक करारात एक वर्षापूर्वी संघात आलेल्या ऋषभ पंतने ए श्रेणीत स्थान पटकावले. त्याला या करारामुळे वर्षाला 5 कोटी रुपये मिळतात.

कर्णधार विराट कोहली, हिटमॅन रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश बीसीसीआयने ए श्रेणीत केला आहे. या तिघांनाही वर्षाला 7 कोटी रुपये दिले जाणार आहेत.

भारताला तीनही प्रकारात विश्वचषक जिंकून देणारा महेंद्रसिंग धोनी ए श्रेणीमध्ये असून कर्णधार विराट कोहलीसह तीन खेळाडूंचा समावेश ए श्रेणीत करण्यात आला आहे.

ऋषभ पंतसोबत ए श्रेणीमध्ये 11 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये महेंद्र सिंग धोनीसह आर अश्विन, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे शिखर धवन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, कुलदीप यादव आणि ऋषभ पंत यांचा समावेश आहे.

हार्दिक पांड्या, के एल राहुल, उमेश यादव, युझवेंद्र चहल यांचा समावेश बी श्रेणीत करण्यात आला आहे. त्यांना वर्षाला तीन कोटी रुपये मिळणार आहेत.

सी श्रेणीतील खेळाडूंना वर्षाला 1 कोटी रुपये दिले जातात. या श्रेणीत केदार जाधव, दिनेश कार्तिक, अंबाती रायडु, मनिष पांडे, हनुमा विहारी आणि वृद्धिमान साहा यांचा समावेश करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 18, 2019 08:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close