युवराज आणि रायडू यांच्यानंतर आणखी एका क्रिकेटपटूची निवृत्ती!

युवराज आणि रायडू यांच्यानंतर आणखी एका क्रिकेटपटूची निवृत्ती!

युवराज आणि रायुडू यांच्यानंतर भारताच्या आणखी एका क्रिकेटपटूनं निवृत्ती जाहीर केली.

  • Share this:

हैदराबाद, 30 जुलै : भारताचा माजी क्रिकेटपटू आणि आंध्रप्रदेशचा माजी कर्णधार वेणुगोपाल रावने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. वेणुगोपाल रावने भारताकडून 16 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याने लंकेविरुद्ध 30 जुलै 2005 मध्ये पदार्पण केलं होतं.

वेणुगोपाल रावने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 7 हजारपेक्षा जास्त धावा केल्या होत्या. तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये 4 हजारपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मात्र चमक दाखवता आली नाही.

भारताने 2000 मध्ये अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला होता. या संघात युवराज सिंग, मोहम्मद कैफ यांच्यासोबत वेणुगोपाल रावसुद्धा होता. वेणुगोपालला कामगिरीत सातत्य राखता आलं नाही.

आयपीएलमध्ये वेणुगोपालनं 65 सामने खेळले आहेत. त्याने डेक्कन चार्जर्स, दिल्ली डेअर डेव्हिल्स आणि सनरायजर्स हैदराबाद या संघाचे प्रतिनिधीत्व केलं आहे. 2009 च्या आयपीएल विजेत्या संघातही वेणुगोपाल होता.

विचित्र गोलंदाजीने फलंदाजाची तारांबळ, VIDEO पाहून तुम्हीही व्हाल हैराण!

भारताला मोठा धक्का; पृथ्वी शॉ डोप टेस्टमध्ये दोषी, BCCIनं घातली बंदी

VIDEO : जितेंद्र आव्हाडांचा शिवेंद्रराजेंच्या वारस हक्कावर प्रश्नचिन्ह, दिलं 'हे' थेट आव्हान!

Published by: Suraj Yadav
First published: July 30, 2019, 9:34 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading