मुंबई, 15 जानेवारी : अंडर-19 वर्ल्ड कपमधील (Under-19 World Cup) टीम इंडियाची पहिली मॅच आज (शनिवार) दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) विरुद्ध होणार आहे. या स्पर्धेत पाचव्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याच्या निर्धाराने टीम इंडिया उतरणार आहे. भारतीय टीम सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. ही टीम अंडर-19 आशिया कप स्पर्धा जिंकून वेस्ट इंडिजमध्ये दाखल झाली आहे. त्याचबरोबर स्पर्धेतील वॉर्म अप मॅचमध्ये त्यांनी वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाचा सहज पराभव केला होता.
दिल्लीकर यश ढूल (Yash Dhull) टीम इंडियाचा कॅप्टन आहे. आशिया कप स्पर्धेत फार कमाल न करू शकलेल्या यशने वॉर्म अप मॅचमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्याचबरोबर ओपनर हरनूर सिंहकडून टीम इंडियाला मोठी अपेक्षा आहे. हरनूरनं आशिया कप स्पर्धेतील 5 मॅचमध्ये 251 रन काढले आहेत. तसेच ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वॉर्म-अप मॅचमध्ये शतक झळकावले आहे. त्याचबरोबर राजवर्धन हंगरगेकर आणि रवी कुमार या फास्ट बॉलर्सवर भारतीय टीमची भिस्त आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना किती वाजता सुरू होणार?
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता सुरू होईल.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना कुठे होईल?
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना वेस्ट इंडिजमधील गयानामध्ये खेळला जाणार आहे.
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील लाईव्ह प्रसारण कुठे पाहता येईल?
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील लाईव्ह प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहाता येऊ शकेल.
भारत-दक्षिण आफ्रिका सामन्याचे Live Streaming कुठे पाहता येईल?
भारत-दक्षिण आफ्रिका सामन्याचे Live Streaming हॉटस्टारवर पाहता येईल.
IPL 2022 : CSK चा कॅप्टन या सिझनमध्येच बदलणार, 3 वेळा विजेतेपद पटकावणारा घेणार धोनीची जागा!
टीम इंडियाचे वेळापत्रक
15 जानेवारी : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रीका, गयाना
19 जानेवारी : भारत विरुद्ध आयर्लंड, त्रिनिदाद
22 जनवरी : भारत विरुद्ध युगांडा, त्रिनिदाद
अंडर-19 वर्ल्ड कपसाठी भारतीय टीम
यश ढूल (कर्णधार), हरनूर सिंग, अंगक्रिश रघुवंशी, एसके रशीद (उपकर्णधार), निशांत सिंधू, सिद्धार्थ यादव, अनीश्वर गौतम, दिनेश बाना, आराध्य यादव (विकेटकीपर), राज अंगद बावा, मानव पारखी, कौशल तांबे, आरएस हंगरगेकर, वासू वत्सो, विक्की ओस्तवाल, रवी कूमार आणि गर्व सांगवा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, South africa, Team india