मुंबई, 8 डिसेंबर : टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर तीन टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. या सीरिजमधील पहिली टेस्ट 26 डिसेंबरला सुरू होणार आहे. या दौऱ्यावर जाणाऱ्या टीमची मंगळवारी घोषणा होणार होती. पण टीम निवडीवरून कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि राहुल द्रविडचे (Rahul Dravid) निवड समितीशी मतभेद झाले आहेत. त्यामुळे ही निवड लांबवणीवर पडल्याचं वृत्त आहे.
'इनसाईड स्पोर्ट्स' नं दिलेल्या वृत्तानुसार सध्या खराब फॉर्मात असलेले अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांना निवड समिती आणखी एक संधी देण्याची शक्यता आहे. मात्र इशांत शर्माची (Ishant Sharma) निवड त्याच्या फिटनेसवर अवंबून आहे. इशांतच्या जागेवर तरूण खेळाडूला संधी द्यावी असं निवड समितीचं मत आहे. तर विराट आणि द्रविड यांनी अनुभवी इशांतच्या निवडीचा आग्रह धरला आहे.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, ' दक्षिण आफ्रिकेचा दौरा टीम इंडियासाठी आव्हानात्मक आहे. भारतीय क्रिकेट टीमने आजवर एकदाही आफ्रिकेत सीरिज जिंकलेली नाही. तरीही कॅप्टन आणि कोचचा अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारावर पूर्ण विश्वास आहे. त्यांचा फॉर्म या दौऱ्यात परत येईल अशी या दोघांना खात्री आहे. ' अजिंक्यची दक्षिण आफ्रिकेतील टेस्टमध्ये सरासरी 53 असून पुजाराची 31 आहे. तर इशांत शर्माला आजवर 7 टेस्टमध्ये फक्त 20 विकेट्स मिळाल्या आहेत.
IPL 2022: प्रीती झिटांच्या टीमनं केलं दुर्लक्ष, 11 बॉलमध्ये 54 रन करत दिलं उत्तर
टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यात तीन वन-डे मॅच खेळणार आहे. ही सीरिज 19 जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यामुळे या टीमची घोषणा नंतर करण्यात येणार आहे. बुधवारपासूनच विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेला सुरूवात झाली आहे. या स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचाही वन-डे टीमसाठी विचार होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rahul dravid, South africa, Team india, Virat kohli