मुंबई, 4 डिसेंबर : दक्षिण आफ्रिकामधील ओमिक्रॉन (Omicron) व्हायरंटमुळे टीम इंडियाचा दौरा (India tour of South Africa) संकटात आला होता. या दौऱ्याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. बीसीसीआयनं अखेर या विषयावरील सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. टीम इंडिया या महिन्यात होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात फक्त 3 वन-डे आणि 3 टेस्ट होणार असल्याचं बीसीसीआय सचिव जय शहा (Jay Shah) यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर टी20 सीरिजचं आयोजन नंतर होणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं.
नियोजित वेळापत्रकानुसार या दौऱ्यात 4 टेस्ट, 3 वन-डे आणि 4 टी20 मॅच होणार होत्या. या दौऱ्यातील वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. मात्र ओमिक्रॉनच्या संकटातही हा दौरा रद्द करण्यास बीसीसीआनं नकार दिला आहे, असं वृत्त ANI नं दिले आहे.
India to tour South Africa for three Tests and three ODIS, T20Is to be played later: BCCI secretary Jay Shah to ANI pic.twitter.com/2DkPVEDGzR
— ANI (@ANI) December 4, 2021
टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) दोन दिवसांपूर्वी मीडियाशी बोलताना याबाबत बीसीसीआयकडे स्पष्टीकरण मागितले होते. 'आम्ही बीसीसीसीआयशी चर्चा करत आहोत. आम्हाला आणखी काही स्पष्टीकरण हवं आहे. येत्या काही दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होईल अशी आशा आहे. राहुल भाई (द्रविड) यांनी सर्व सिनिअर खेळाडूंशी चर्चा केली आहे. ही सामान्य परिस्थिती नाही.' असे विराट म्हणाला होता.
9 दिवसांत झाल्या 4 ओपन हार्ट सर्जरी, 'त्या' आठवणी सांगताना दिग्गज क्रिकेटपटू भावुक
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BCCI, Cricket news, South africa, Team india