मुंबई, 3 डिसेंबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील दुसरी आणि शेवटची टेस्ट सध्या मुंबईत सुरू आहे. या सीरिजचा निकाल या टेस्टनंतर निश्चित होणार आहे. त्यापूर्वीच टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India tour of South Africa) चर्चा सुरू आहे. नियोजित वेळापत्रकानुसार टीम इंडिया 9 डिसेंबर रोजी या दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेतील ओम्रिकॉनच्या (Omicron) गंभीर परिस्थितीमुळे हा दौरा संकटात आला आहे.
या दौऱ्यावर रवाना होण्यासाठी फक्त 5 दिवस बाकी आहेत, तरीही टीम इंडियाची घोषणा झालेली नाही. तसेच दौऱ्याकतील कार्यक्रमाबात कोणतीही माहिती अद्याप खेळाडूंना देण्यात आलेली नाही. ओम्रिकॉनमुळे आफ्रिकेतील कोरोना पेशंट्सची संख्या एका दिवसांत दुप्पट झाली आहे. मंगळवारी 4373 रुग्ण आढळले होते, बुधवारी ही संख्या 8 हजारांच्या पुढे गेली आहे.
दक्षिण आफ्रिकेतील परिस्थितीमुळे या दौऱ्यावर जाण्यासाठी टीम इंडियातील काही खेळाडू तयार नाहीत, अशी माहिती पुढे आली आहे. त्यामुळे हा दौरा रद्द होणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे. बीसीसीआयतच्या एका अधिकाऱ्यानं 'इनसाईड स्पोर्ट्स' या वेबसाईटशी बोलताना काही खेळाडू काळजीत असल्याचं मान्य केलं. त्याचबरोबर दौऱ्याचे वेळापत्र निश्चित होण्यापूर्वी त्यांचे मत विचारात घेणार असल्याचेही स्पष्ट केले. या सर्व गोष्टी स्पष्ट होण्यासाठी एक-दोन दिवसांचा कालावधी लागेल, असा दावा या अधिकाऱ्यानं केला आहे.
विराटनं केली मागणी
टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहलीनं देखील या विषयावर बीसीसीआयकडे स्पष्टीकरण मागितले आहे. आम्ही बीसीसीसीआयशी चर्चा करत आहोत. आम्हाला आणखी काही स्पष्टीकरण हवं आहे. येत्या काही दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होईल अशी आशा आहे. राहुल भाई (द्रविड) यांनी सर्व सिनिअर खेळाडूंशी चर्चा केली आहे. ही सामान्य परिस्थिती नाही. आम्ही टीममधील सर्व सदस्यांशी चर्चा केली आहे.' असे विराटने गुरुवारी मीडियाशी बोलताना सांगितले.
IND vs NZ: टीम इंडियातील 'या' खेळाडूला आहेत 2 आई, विराटनं दिली 57 महिन्यानंतर संधी
दक्षिण आफ्रिकेतील स्पर्धा रद्द
क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने (Cricket South Africa) टीमचे काही सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर स्थानिक मॅच स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे डिव्हिजन टू सीएसए या चार दिवसीय स्थानिक सीरिजच्या चौथ्या टप्प्याच्या सगळ्या तीन मॅच स्थगित करत आहे. 2 ते 5 डिसेंबरदरम्यान या मॅच होणार होत्या,' असं क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने सांगितलं आहे. ही सीरिज बायो-बबलमध्ये होत नसून गेल्या काही दिवसांमध्ये काही जणांच्या कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत, असंही क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनं सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, South africa, Team india