IND vs AUS : कोहलीच्या अनुपस्थिती निराशाजनक पण... पाहा काय म्हणाला ऑस्ट्रेलियाचा लायन

IND vs AUS : कोहलीच्या अनुपस्थिती निराशाजनक पण... पाहा काय म्हणाला ऑस्ट्रेलियाचा लायन

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टेस्ट सीरीजच्या शेवटच्या तीन सामन्यांत विराट कोहली (Virat Kohli) खेळणार नाही. विराटची अनुपस्थिती निराशाजनक आहे, पण यामुळे ऑस्ट्रेलियाला बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे, असं मत अनुभवी स्पिनर नॅथन लायन Nathan Lyon) ने व्यक्त केलं आहे.

  • Share this:

मेलबर्न, 13 नोव्हेंबर : ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टेस्ट सीरीजच्या शेवटच्या तीन सामन्यांत विराट कोहली (Virat Kohli) खेळणार नाही. विराटची अनुपस्थिती निराशाजनक आहे, पण यामुळे ऑस्ट्रेलियाला बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे, असं मत अनुभवी स्पिनर नॅथन लायन Nathan Lyon) ने व्यक्त केलं आहे. भारतीय क्रिकेट बोर्डने विराटला पितृत्वाची रजा मंजूर केल्यामुळे तो पहिल्या कसोटी सामन्यानंतर मायदेशी परतणार आहे.

विराट कोहलीला जानेवारीच्या सुरुवातीला आपल्या पहिल्या बाळाच्या जन्माच्या वेळी आपली पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत राहण्याची इच्छा आहे. जगातील सर्वोत्कृष्ट बॅट्समनपैकी एक असलेल्या कोहलीला आऊट करण्याची संधी आपल्याला मिळणार नाही, हे खूपच निराशाजनक आहे, असं नॅथन लायन म्हणाला.

'विराटचं नसणं ही सीरीजच्या दृष्टीने खूपच निराशाजनक गोष्ट आहे.‌ मला जगातील सर्वात चांगल्या खेळाडूंविरुद्ध खेळायला आवडतं, आणि विराट हा स्टिव्ह स्मिथ आणि मार्नस लब्युशेन यांच्यासह जगातील सर्वोत्तम बॅट्समन आहे. पण मला त्याच्यासोबत खेळायला मिळणार नाही, हे खूपच निराशजनक आहे. पण त्यांच्याकडे अजूनही खूप सुपरस्टार आहेत. त्यांच्या टीममध्ये चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांच्यासोबत अनेक उत्तम बॅट्समन आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत खेळणं हेदेखील आमच्यासाठी एक मोठे आव्हानच ठरणार आहे. विराट खेळला नाही याचा अर्थ असा नाही की आम्हीच ट्रॉफी जिंकली. तरीही आम्हाला मेहनत घ्यावीच लागणार आहे', अशी प्रतिक्रिया लायनने दिली.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात (India vs Australia) भारताला 3 वन-डे सामने, 3 टी-20 आणि 4 कसोटी सामने खेळायचे आहेत. या सामन्यांची सुरुवात 27 नोव्हेंबरला वन-डे सीरीजने होणार आहे, तसंच टेस्ट सीरीज 17 डिसेंबरला सुरु होणार आहे. यामध्ये कोहली मेलबर्नमधील 26 ते 30 डिसेंबरदरम्यानची बॉक्सिंग डे टेस्ट, सिडनीमध्ये 7 ते 11 जानेवारी या नव्या वर्षात होणारी टेस्ट आणि ब्रिस्बेनमधील 15 ते 19 जानेवारीला होणारी शेवटचा टेस्ट मॅच खेळू शकणार नाही.

Published by: Shreyas
First published: November 13, 2020, 6:50 PM IST
Tags:

ताज्या बातम्या