मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टेस्टसोबतच ही मॅचदेखील खेळणार नाही विराट

IND vs AUS : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टेस्टसोबतच ही मॅचदेखील खेळणार नाही विराट

आयपीएल (IPL 2020) संपल्यानंतर भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. या दौऱ्यात भारतीय टीम 3 वनडे, 3 टी-20 आणि 4 टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे.

  • Published by:  Shreyas
सिडनी, 14 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020) संपल्यानंतर भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. या दौऱ्यात भारतीय टीम 3 वनडे, 3 टी-20 आणि 4 टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. वनडे सीरिजला 27 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. यानंतर टी-20 आणि टेस्ट सीरिज खेळवली जाईल. 17 डिसेंबरपासून ऍडलेडमध्ये डे-नाईट टेस्टपासून टेस्ट सीरिजला सुरुवात होईल. या टेस्ट सीरिजआधी दोन टूर मॅच खेळवल्या जाणार आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या सिनियर टीमचे 9 खेळाडू आणि भारतीय टेस्ट टीमचे बहुतेक खेळाडू खेळणार आहेत. पण कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) पहिल्या टूर मॅचमध्ये दिसणार नाहीत. पहिली टूर मॅच 6 डिसेंबर ते 8 डिसेंबर या कालावधीमध्ये सिडनीत आणि दुसरी मॅच डे-नाईट असेल. 11 ते 13 डिसेंबरदरम्यान दुसरी टेस्ट मॅच खेळवण्यात येईल. ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीने या मॅचसाठी 19 खेळाडूंची यादी बनवली आहे. यामध्ये टेस्ट कर्णधार टीम पेन, जो बर्न्स, ट्रेविस हेड, जेम्स पॅटिनसन यांचा समावेश आहे. पहिली टूर मॅच आणि टी-20 सीरिज एकाचवेळी होणार असल्यामुळे विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह टूर मॅच खेळू शकणार नाहीत. पण ऑस्ट्रेलियाच्या समोर चेतेश्वर पुजाराचं आव्हान असेल. 2018-19 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पुजाराने तब्बल 521 रन केले होते. या टूर मॅचमध्ये अश्विन, हनुमा विहारी, पृथ्वी शॉ, शुभमन गिल आणि ऋषभ पंत खेळणार आहेत. दुसऱ्या टूर मॅचमध्ये विराट कोहली, केएल राहुल, मयंक अग्रवाल, रविंद्र जडेजा, बुमराह आणि मोहम्मद शमी खेळण्याची शक्यता आहे. विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यात फक्त वनडे, टी-20 सीरिज आणि पहिली टेस्ट मॅच खेळणार आहे. यानंतर तो भारतात परतणार आहे. विराटची पत्नी अनुष्का शर्मा बाळाला जन्म देणार असल्यामुळे विराट दौरा अर्धवट सोडून भारतात येणार आहे.
First published:

पुढील बातम्या