Home /News /sport /

ऍडलेड टेस्टनंतर विराट भारतात परतणार, वनडे, टी-20 टीममध्येही बदल

ऍडलेड टेस्टनंतर विराट भारतात परतणार, वनडे, टी-20 टीममध्येही बदल

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीच्या टीम इंडियामध्ये बदल करण्यात आले आहेत. टेस्ट सीरिजची पहिली ऍडलेट टेस्ट खेळल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) भारतात परतणार आहे.

    मुंबई, 9 नोव्हेंबर : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीच्या टीम इंडियामध्ये बदल करण्यात आले आहेत. टेस्ट सीरिजची पहिली ऍडलेट टेस्ट खेळल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) भारतात परतणार आहे. विराटची पत्नी अनुष्का शर्मा बाळाला जन्म देणार असल्यामुळे विराट दौरा अर्धवट सोडून येणार आहे. तर टेस्ट सीरिजसाठी रोहित शर्मा (Rohit Sharma) ची टीममध्ये निवड झाली आहे, पण त्याला वनडे आणि टी-20 साठी विश्रांती देण्यात आली आहे. आयपीएल (IPL 2020) दरम्यान रोहित शर्माच्या मांडीच्या स्नायूंना दुखापत झाली होती, त्यानंतर रोहितची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीच्या टीममध्ये निवड झाली नव्हती. पण दुखापतीनंतरही रोहित नेटमध्ये सराव करताना दिसला, तसंच आयपीएल मॅचसाठीही तो मैदानात उतरला, त्यामुळे वाद निर्माण झाला होता. दुसरीकडे संजू सॅमसन (Sanju Samson) याची वनडे टीमसाठी आणखी एक विकेट कीपर म्हणून निवड झाली आहे. तर इशांत शर्मा (Ishant Sharma) याच्या दुखापतीवर बंगळुरूच्या एनसीएमध्ये उपचार सुरू आहेत. इशांत जेव्हा पूर्णपणे फिट होईल, तेव्हा तो टीम इंडियाच्या टेस्ट टीममध्ये असेल, असं बीसीसीआयने सांगितलं आहे. भारताच्या टी-20 सीरिजसाठी निवड झालेला वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) खांद्याच्या दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. त्याच्याऐवजी टी. नटराजन याची टीममध्ये निड झाली आहे. टीम इंडियाचा टेस्टसाठीचा विकेट कीपर ऋद्धीमान सहा यालाही आयपीएलदरम्यान दोन्ही मांड्यांच्या स्नायूंना दुखापत झाली होती. सहाच्या टेस्ट टीममधल्या सहभागाबाबत नंतर निर्णय घेण्यात येणार आहे. कमलेश नागरकोटी हा फास्ट बॉलर नेटमध्ये खेळाडूंना सराव देण्यासाठी जाणार होता, पण त्यालाही ऑस्ट्रेलियात पाठवण्यात येणार नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारत 3 वनडे, 3 टी-20 आणि 4 टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. यातल्या टी-20 आणि वनडे सीरिजसाठी केएल राहुल टीम इंडियाचा उपकर्णधार आहे, तर अजिंक्य रहाणे टेस्ट टीमचा उपकर्णधार आहे. 27 नोव्हेंबरपासून टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला वनडे सीरिजपासून सुरुवात होणार आहे. टी-20 टीम विराट कोहली, शिखर धवन, मयंक अग्रवाल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, टी नटराजन वनडे टीम विराट कोहली, शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रविंद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकुर, संजू सॅमसन भारताची टेस्ट टीम विराट कोहली, रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋद्धीमान सहा, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव,रविंद्र जडेजा, आर. अश्विन, मोहम्मद सिराज
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या