S M L

IndvsEnd Test Series: रोहित शर्माला वगळले, रहाणेकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी

भुवनेश्वर कुमारलाही विश्रांती देण्यात आली आहे

Updated On: Jul 18, 2018 03:32 PM IST

IndvsEnd Test Series: रोहित शर्माला वगळले, रहाणेकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी

नवी दिल्ली, 18 जुलैः टी- 20 आणि एकदिवसीय सामन्यांनंतर टीम इंडिया इंग्लंडविरोधात पाच कसोटी सामने खेळायला सज्ज झाली आहे. 1 ऑगस्टपासून या मालिकेला सुरूवात होणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या 3 कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ घोषित करण्यात आला आहे. संघात ऋषभ पंत आणि कुलदीप यादवला खेळण्याची संधी मिळणार असून भुवनेश्वर कुमारला विश्रांती देण्यात आली आहे.

इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भुवनेश्वर कुमारला दुखापत झाली. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे भुवी पहिल्या तीन सामन्यांमध्ये खेळणार नाही हे निश्चित झाले आहे. पुढील दोन सामन्यांमध्ये त्याला खेळण्याची संधी मिळू शकते.

Loading...

असे म्हटले जाते की, जसप्रीत बुमराहलाही कसोटी सामन्यांसाठी बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. जसप्रीत बुमराहला आयलँडविरुद्धच्या टी-20 सामन्यात बोटाला दुखापत झाली होती. रिद्धिमान साहादेखील अनफिट असल्यामुळे दिनेश कार्तिककडे यष्टीरक्षणाची जबाबदारी देण्यात येऊ शकते. तसेच ऋषभ पंत आणि पार्थिव पटेल यांच्यातील एका खेळाडूला कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळू शकते.

भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, एम. विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य राहणे (उप-कर्णधार), करुण नायर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसमीत बुमराह, शार्दुल ठाकुर.

हेही वाचाः

तो सपासप वार करत होता, आणि लोक पाहत होते!, पोलिसाची हत्या सीसीटीव्हीत कैद

भाजपविरोधात आंदोलनामुळे मनसे कार्यकर्त्यांना थर्ड डिग्री, राज ठाकरेंचा गंभीर आरोप

कांदिवलीत नग्न फोटो काढून 16 वर्षाच्या मुलाला केलं ब्लॅकमेल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 18, 2018 03:32 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close