धोनीला निवृत्ती घेण्यापासून संघ व्यवस्थापनाने थांबवलं ?

धोनीला निवृत्ती घेण्यापासून संघ व्यवस्थापनाने थांबवलं ?

विंडीज दौऱ्यातून माघार घेतल्यानंतर धोनीच्या निवृत्तीची चर्चा होत आहे. त्याच्या जागी पंतला अधिक संधी दिली जाईल असं निवड समितीने म्हटलं आहे.

  • Share this:

मुंबई, 23 जुलै : ICC Cricket World Cup स्पर्धा झाल्यापासून भारतात धोनीच्या निवृत्तीचीच चर्चा जास्त रंगली आहे. अनेकांनी आता धोनीच्या निवृत्तीची वेळ झाली असून नव्या खेळाडूंच्या हाती कमान द्यायला हवी असं म्हटलं आहे. दरम्यान, वेस्ट इंडीज दौऱ्यातून धोनीने माघार घेतली. त्यानंतर संघ जाहीर करण्यात आला. यावेळी धोनीच्या जागी ऋषभ पंतकडे तीनही प्रकारात यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पंतची निवड ही टी20 वर्ल्ड कप नजरेसमोर ठेवून करण्यात आली आहे. असे असले तरीही संघ व्यवस्थापनाला धोनीने निवृत्ती घेऊ नये असेच वाटत आहे.

धोनीने निवृत्ती घेतली तर त्याची जागा पंत घेईल पण जर त्यानंतर पंतला दुखापत झाली तर काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे टी20 वर्ल्ड कपमध्ये पंतला दुखापत झाल्यास संघात पोकळी निर्माण होईल आणि ती भरून काढणं कठीण असेल. सूत्रांनी आयएएनएसला सांगितले की, धोनीला त्याची जबाबदारी आणि स्थिती माहिती आहे. सर्वजण त्याच्या निवृत्तीची चर्चा करत आहेत. सध्या पंतला जास्तीजास्त संधी देण्याचा प्रयत्न असेल. धोनी एक मेंटर म्हणून संघात असेल. जेव्हा संघाला गरज पडेल तेव्हा तो उपलब्ध राहील.

विंडीज दौऱ्यासाठी संघ जाहीर केल्यानंतर प्रसाद यांनी म्हटलं होतं की, पंतला सर्व प्रकारासाठी प्राधान्य दिलं जात आहे. आता धोनीने कधी सन्यास घ्यायचा हा त्याचा निर्णय आहे आणि त्यालाच याबद्दल माहिती आहे. आम्ही पुढच्या वर्ल्ड कपच्या दृष्टीने वाटचाल करत आहोत. त्यासाठी रणनिती ठरवण्यात आली आहे. सध्यातरी पंतसारख्या खेळाडूंना संधी दिली जाईल.

धोनी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी उपलब्ध नाही. पण पुढील वर्ल्ड कपसाठी आम्ही रोड मॅप तयार केला आहे. 2023मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी पंतला अधिक संधी दिली जाणार आहे. यासंदर्भात आम्ही धोनी सोबत चर्चा केल्याचे प्रसाद म्हणाले. वेस्ट इंडिज दौऱ्यातील भारतीय खेळाडूंची नावे जाहीर करताना प्रसाद यांनी अप्रत्यक्षपणे धोनीची वेळ संपली आहे. आता पंतला अधिक संधी मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

World Cup मध्ये शमी-जडेजा यांच्यामुळे रोहित-विराटचं बिनसलं?

धोनीने आपण विंडीज दौऱ्यातून माघार घेत असल्याचे बीसीसीआयला कळवले होते. त्यानंतर धोनी दोन महिने काय करणार याची चर्चा सुरू होती.धोनी भारतीय लष्करातील पॅराशूट रेजिमेंटचा सदस्य आहे. त्याला मानद लेफ्टनंट कर्नलपद बहाल करण्यात आलं आहे. त्यामुळे धोनी आता लष्करात सेवा बजावणार आहे. मात्र, धोनी लष्करात जाऊन काय करणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.

धोनीच्या लष्कर ट्रेनिंगची इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूनं केली मस्करी, झाला ट्रोल

लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धोनीला लष्करप्रमुखांनी सैन्यासोबत सराव करण्याची परवानगी दिली आहे. धोनी पॅराशूट रेजिमेंटचा सदस्य असल्यानं त्या रेजिमेंटमधूनच सराव करणार आहे. या रेजिमेंटचा सराव जम्मू आणि काश्मिरमध्ये होणार आहे. धोनीला सरावात भाग घेता येणार असला तरी लष्कराच्या मोहिमांमध्ये प्रत्यक्ष सहभागी होता येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आलं आहे.

कोणाला हवा विराट, कोणाला हवा रोहित; भारतीय संघात पडली उभी फूट!

VIDEO: चंद्रकांत पाटलांनी 'हा' बालिशपणा सोडून द्यावा; धनंजय मुंडेंचा टोला

Published by: Suraj Yadav
First published: July 23, 2019, 10:46 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading