INDvsWI : ऋषभ पंतला संघाबाहेर बसवू शकतो हा खेळाडू, वेस्ट इंडीज दौऱ्यात मिळणार संधी?

भारतीय संघ ऑगस्टमध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय, टी20 आणि कसोटी मालिका खेळणार असून यासाठी संघाची घोषणा रविवारी होणार आहे.

  • Share this:

वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड रविवारी होणार आहे. भारत वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय, टी20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे. यासाठी भारतीय संघाची निवड होणार आहे. वेस्ट इंडीज दौऱ्यातून धोनीने माघार घेतली आहे.  त्यामुळे ऋषभ पंतची वर्णी नक्की आहे. टी20 मध्ये पंतची जागा निश्चित मानली जात असली तरी निवड समिती आणखी एका यष्टीरक्षकाला संघात स्थान देण्याची शक्यता आहे.

भारताचा यष्टीरक्षक वृद्धीमान साहा दुखापतीतून सावरला असून इंडिया ए मध्ये खेळत आहे. तो बाहेर गेल्यानं पंतला संधी मिळाली होती. पंतने फलंदाजीत चमक दाखवली असली तरी यष्टीरक्षणात मात्र तो कमी पडताना दिसत आहे. 34 वर्षीय साहाने 32 कसोटीत 1 हजार 164 धावा केल्या होत्या. याशिवाय यष्टीरक्षण करताना 75 झेल आणि 10 स्टम्पिंग केले होते.

सध्याची परिस्थिती पाहता साहाला संघात स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. भारतीय संघात युवा खेळाडूंना संधी देण्यास निवड समिती प्राधान्य देत असल्याचं दिसत आहे.  वेस्ट इंडीज दौऱ्यावर बॅक अप पर्याय आणि पंतवरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने आणखी एका यष्टीरक्षकाची संघात निवड केली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये आंध्र प्रदेशच्या केएस भरतचे नाव आघाडीवर आहे.

केएल भरतने इंडिया ए कडून 11 प्रथम श्रेणी सामने खेळले असून यात 3 शतक आणि 2 अर्धशतकांसह 686 धावा केल्या आहेत. यात तो दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज आणि न्यूझीलंडविरुद्ध खेळला आहे.

प्रथम श्रेणीचे 65 सामने खेळताना त्याने 3 हजार 798 धावा केल्या आहेत. यात 8 शतके आणि 20 अर्धशतेक केली आहेत.  तर यष्टीरक्षण करताना 223 झेल आणि 27 स्टम्पिंग केले आहेत. तोसुद्धा वेस्ट इंडीज ए विरुद्धच्या कसोटी मालिकेत इंडिया ए मधून खेळत आहे.

2012 मध्ये भरतने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यानं फलंदाजीत चांगली कामगिरी केली आहे. साहाचे वय पाहता त्याच्याऐवजी केएस भरतला संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 21, 2019 08:59 AM IST

ताज्या बातम्या