मुंबई, 21 जुलै : वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड रविवारी होणार आहे. भारत वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय, टी20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे. यासाठी भारतीय संघाची निवड होणार आहे. दरम्यान भारतीय संघासाठी खूशखबर असून दुखापतीने वर्ल्ड कपला मुकलेला शिखर धवन तंदुरुस्त झाला आहे. तो वेस्ट इंडीज दौऱ्यात खेळण्याची शक्यता आहे.
शिखर धवनने वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतकी खेळी केली होती. त्यानंतर त्याला अंगठ्याच्या दुखापतीने संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं होतं. त्याच्या अंगठ्याला प्लास्टर करण्यात आलं होतं. धवन बाहेर पडल्यानंतर रोहित शर्मासोबत केएल राहुल सलामीला उतरला होता.
भारताचा कर्णधार विराट कोहली आणि निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांची बैठक सुरू आहे. त्याआधी विराटने शिखर धवन वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी उपलब्ध असल्याचं सांगितलं आहे. तर भारताचा यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने वेस्ट इंडीज दौऱ्यातून नाघार घेतली आहे.
आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये भारताला न्यूझीलंडकडून पराभूत व्हावं लागलं. भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर 3 ऑगस्टपासून जाणार आहे. यात तीन टी 20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळले जातील. दौऱ्याची सुरुवात टी 20 मालिकेपासून होणार आहे. त्यानंतर एकदिवसीय मालिका 8 ऑगस्ट तर कसोटी मालिका 22 ऑगस्टला सुरू होणार आहे.
संभाव्य भारतीय संघ : रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, श्रेयस अय्यर, शुभमन गिल, ऋषभ पंत, कुणाल पांड्या, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, इशान किशन, भुवनेश्वर कुमार, नवीदीप सैनी, खलील अहमद, आवेश खान
सांगलीच्या 'गज्या'ने मालकाला केलं कर्जातून मुक्त!