भारतातल्या क्रिकेटच्या ऐतिहासिक पर्वाला सुरुवात; होणार पहिला डे/नाईट कसोटी सामना!

भारतातल्या क्रिकेटच्या ऐतिहासिक पर्वाला सुरुवात; होणार पहिला डे/नाईट कसोटी सामना!

भारतीय क्रिकेट संघाच्या गुलाबी पर्वाची सुरुवात इडन गार्डन्स मैदानावरून होणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर: भारतीय क्रिकेट संघाच्या गुलाबी पर्वाची सुरुवात इडन गार्डन्स मैदानावरून होणार आहे. आगामी भारतीय दौऱ्यावर बांगलादेशचा संघ (Bangladesh Cricket Team) इडन गार्डन्स (Eden Gardens)मैदानावर डे/नाईट कसोटी सामना खेळणार आहे. यासंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळा(BCCI)ने दिलेल्या प्रस्तावाला बांगलादेश क्रिकेट बोर्डा(Bangldesh Cricket Board)ने हिरवा कंदील दाखवला आहे. जागतिक क्रिकेटमध्ये डे/नाईट कसोटीला आधीच सुरुवात झाली आहे. पण भारतात हा पहिलाच अशा प्रकारचा सामना होत आहे. भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि ऐतिहासिक अशा इडन गार्डन्स (Eden Gardens) मैदानावर वर्ल्डकपमधील दोन फायनल झाल्या आहेत. यातील पहिला फायनल सामना 1987च्या वर्ल्डकपमध्ये झाला होता. त्यानंतर 2016च्या टी-20 वर्ल्डकपमधील फायनल याच मैदानावर झाला होता. याशिवाय अनेक महत्त्वाचे कसोटी सामने या मैदानावर झाले आहेत. असा ऐतिहासिक क्षणांचा साक्षिदार असलेले हे मैदान पुन्हा एकदा इतिहासात नाव नोंदण्यास सज्ज झाले आहे.

BCCIचे अध्यक्ष सौरव गांगुलीने डे/नाईट कसोटी क्रिकेटचे समर्थन केले होते. यासंदर्भात गांगुलीने बांगलादेशला प्रस्ताव देखील दिला होता. बांगलादेश क्रिकेट संघाच्या व्यवस्थापनाने आणि खेळाडूंनी या प्रस्तावाला होकार दिल्याचे गांगुलीने पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे याआधी न्यूझीलंड क्रिकेटकडून डे/नाईट कसोटीचा प्रस्ताव बांगलादेशने फेटाळून लावला होता.

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly)याने 23 ऑक्टोबर रोजी बीसीसीआयचे अध्यक्षपद स्वीकारले होते. गांगुली स्वत: डे/नाईट कसोटी खेळण्याच्या बाजूने आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष असताना गांगुलीने जून 2016मध्ये गुलाबी चेंडूने सामना खेळवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. तेव्हा सुपर लीग फायनलमध्ये मोहन बागान विरुद्ध भवानीपूर यांच्यातील सामना गुलाबी चेंडूने खेळवण्यात आला होता. इतक नव्हे तर दुलीप चषक स्पर्धेत देखील अशाच चेंडू वापरण्यात यावा असा प्रस्ताव गांगुलीने दिला होता. डे/नाईट कसोटीसाठी गुलाबी चेंडूचा वापर केला जातो.

'ठरलं ते झालं नाही तर...',युतीसंदर्भात संजय राऊत यांचं मोठं विधान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 29, 2019 08:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading