अरे भाई केक किधर है? रोहितनं घेतली धोनीची फिरकी

अरे भाई केक किधर है? रोहितनं घेतली धोनीची फिरकी

धोनीच्या वाढदिवसानिमित्त रोहित शर्माने अनोख्या शब्दांत शुभेच्छा दिल्या आहेत. सामन्यानंतरही त्यांन मिश्किल उत्तर देत वाढदिवस कसा साजरा करणार हे सांगितलं होतं.

  • Share this:

लंडन, 07 जुलै : भारताने साखळी फेरीतील अखेरचा सामना जिंकून गुणतक्त्यात अव्वल स्थान पटकावलं. लंकेविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारताने डबल सेलिब्रेशन केलं. यात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या वाढदिवसाचं निमित्त होतं. दरम्यान सामन्यानंतर भारताचा सलामीवीर रोहित शर्माला पत्रकार परिषदेत धोनीचा वाढदिवस कसा साजरा करणार असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर रोहितनं मिश्किल असं उत्तर दिलं होतं. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यानंतरही त्याला ऋषभ पंतबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावरही मजेशीर उत्तर दिलं होतं.

पंतच्या कामगिरीवर काय वाटतं? असं विचारलं असता रोहित म्हणाला होता की तुम्हाला पंत हवा होता आता घ्या. त्यानंतर पंतचा पहिलाच सामना असून तो शिकेल असंही रोहित म्हणाला होता. तर धोनीचा वाढदिवस कसा करणार यावर वाढदिवस आहे कसा साजरा करणारा. वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आणखी काय? असं रोहित म्हणाला होता. त्यानंतर भारताचा पुढचा सामना कुठं होईल हे सध्या माहिती नाही त्यामुळे बसमध्येच केक कापणार असंही रोहित शर्माने सांगितलं होतं.

आता ट्विटरवरून त्यानं पुन्हा एकदा हटके शुभेच्छा दिल्या आहेत. यात रोहित आणि धोनी दोघेही मैदानावर बसेलला फोटो शेअर केला आहे. रोहित हात वर करून कोणाला तरी इशारा करत असलेल्या फोटोला शेअर करताना अरे भाई केक किधर है? असा कॅप्शन देत शुभेच्छा दिल्या आहेत.

भारताचा माजी कर्णधार, फिनीशर आणि कॅप्टन कुल या नावाने ओळखला जाणारा महेंद्रसिंग धोनी आज 38व्या वर्षात पदार्पण करत आहे. 2005मध्यो धोनीनं श्रीलंकेविरोधात कसोटीमध्ये पदार्पण केले होते. तर, 2004मध्ये बांगलादेशविरोधात एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 2014मध्ये धोनीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. दरम्यान सध्या धोनी इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेळत आहे, त्यामुळं त्याचा वाढदिवस भारतीय संघाबरोबरच साजरा करेल.

World Cup : ऑस्ट्रेलियाचे दोन खेळाडू जखमी, संघात घेतलेला 'हा' क्रिकेटर धोकादायक!

11 वर्षांनी पुन्हा विराटच्या वाटेत विल्यम्सनचा अडथळा, कोण मारणार बाजी?

VIDEO: भाजपात प्रवेश करण्यासाठी विचार करण्याची गरज नाही- सपना चौधरी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 7, 2019 06:46 PM IST

ताज्या बातम्या