VIDEO : भारतीय संघ इंग्लंडमध्ये तर रोहित शर्मा मुंबईत दाखल!

World Cup सेमीफायनलमध्ये पराभवानंतर रोहित शर्मा मायदेशी परतला असून भारतीय संघ अद्याप इंग्लंडमध्येच आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 13, 2019 05:43 PM IST

VIDEO : भारतीय संघ इंग्लंडमध्ये तर रोहित शर्मा मुंबईत दाखल!

मुंबई, 13 जुलै : ICC Cricket World Cup मध्ये भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये 18 धावांनी पराभूत व्हावं लागलं. भारतावर विजय मिळवून न्यूझीलंडने फायनलमध्ये प्रवेश मिळवला. भारताच्या पराभवाने सर्वांनाच दु:ख झालं. मात्र, यात सर्वात जास्त निराश झाला तो हिटमॅन रोहित शर्मा. त्याच्या चेहऱ्यावरची निराशा लपून राहिली नव्हती. याशिवाय भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीसुद्धा बाद झाल्यानंतर मैदानावरच भावनिक झालेला दिसला.

वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक पाच शतकं आणि एक अर्धशतक करणाऱ्या रोहित शर्माला सेमीफायनलमध्ये फक्त एक धाव करता आली. साखळी फेरीत जबरदस्त कामगिरी करणारे भारताचे आघाडीचे फलंदाज न्यूझीलंडविरुद्ध ढेपाळले. यानंतर आता रोहित शर्मा मुंबईत पोहचला आहे. अद्याप भारतीय संघ इंग्लंडमध्येच असल्याचं समजतं.

रोहित शर्मा त्याची पत्नी आणि मुलीसह मुंबईच्या विमानतळावर 13 जुलैला पहाटे दिसला. संघातील इतर खेळाडू 14 जुलैला दिल्ली आणि मुंबईत पोहचतील. तिकीटांमुळे संघाला येण्यास उशिर होत असल्याची माहिती मिळते.

Loading...

भारतीय संघ वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर रोहितने भावनिक ट्विट केले. "जेव्हा चांगली खेळण्याची गरज होती, तेव्हा आम्ही चांगली कामगिरी करू शकलो नाही. 30 मिनिटांच्या आमच्या खराब खेळीमुळं आम्हाला वर्ल्ड कप जिंकता आला नाही. माझे अंतकरण जड झालेआहे, खात्री आहे मला तुम्हालाही तसेच वाटत असेल. तरी, घरापासून लांब खेळत असतानाही चाहत्यांनी आम्हाला समर्थन केले. इंग्लंडमध्ये आम्हाला निळा रंग जास्त दिसत होता", असं रोहितनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

World Cup : पराभव जिव्हारी, विराट आणि रोहित यांच्यात दुरावा?

2011मध्ये वर्ल्ड कप संघात नव्हते मिळाले स्थान

रोहित शर्माला 2011च्या वर्ल्ड कप संघात स्थान मिळाले नव्हते. निवड समितीनं रोहित शर्माच्या जागी युसूफ पठाणला संघात स्थान देण्यात आले होते. रोहित शर्माला आजही या गोष्टीचे वाईट वाटते. 2015च्या वर्ल्ड कपमध्ये रोहितला संघात स्थान देण्यात आले होते. मात्र सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं भारताला पराभूत केले होते. त्यामुळं शतक करण्यापेक्षा रोहितसाठी वर्ल्ड कप जिंकणे महत्त्वाचे होते. त्यामुळं त्याला जास्त वाईट वाटले.

रोहित शतकांचा बादशाह

2011च्या वर्ल्ड कपमध्ये रोहितला संघात स्थान मिळाले नव्हते. त्यानंतर 2012मध्ये रोहितनं 2 शतक केले होते. 2015मध्ये रोहितनं एकूण 22 शतक केले होते. शतक करण्यात रोहितनं विराटला मागे टाकले आहे.

ऑपरेशन लोटसचं पुढचं टारगेट आता मध्य प्रदेश आणि राजस्थान?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 13, 2019 05:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...