मुंबई, 10 जुलै : राजस्थानचा फास्ट बॉलर पंकज सिंह (Pankaj Singh) याने निवृत्ती जाहीर केली आहे. पंकजनं टीम इंडियाकडून 2 टेस्ट आणि 1 वन-डे मॅच खेळली आहे. त्याने 2014 साली शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच खेळली आहे. इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) टीमचा तो सदस्य होता. त्याने धोनीच्या नेतृत्त्वात खेळताना दोन टेस्टमध्ये दोन विकेट्स घेतल्या. तर एकमेव वन-डे मॅच 2010साली श्रीलंकेविरुद्ध हरारेमध्ये खेळली होती. त्याला त्या मॅचमध्ये एकही विकेट मिळाली नाही.
पंकज आयपीएलच्या पहिल्या सिझनमध्ये (IPL 2008) राजस्थान रॉयल्स (RR) टीमचा सदस्य होता. त्याने राजस्थानकडून 17 मॅचमध्ये 11 विकेट्स घेतल्या. पंकज आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये यशस्वी ठरला नाही. मात्र त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मोठे यश मिळवले. त्याने 117 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 472 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर 79 A लिस्टच्या मॅचमध्ये 118, 57 टी20 मॅचमध्ये 43, अशा एकूण 253 मॅचमध्ये 633 विकेट्स घेतल्या आहेत.
रणजी क्रिकेटमध्ये 400 पेक्षा जास्त विकेट्स घेणाऱ्या दोन फास्ट बॉलरमध्ये पंकजचा समावेश आहे. त्याने रणजी क्रिकेटमध्ये 409 विकेट्स घेतल्या. पंकजनं 2004 साली राजस्थानकडून पदार्पण केले. तो 2018 पर्यंत राजस्थानकडून खेळला. 2019 च्या रणजी सिझनमध्ये त्याने पदुच्चेरीचं प्रतिनिधित्व केले. राजस्थानला (2010 -11, 2011-12) या दोन सिझनमध्ये रणजी चॅम्पियन बनवण्यात पंकजचे मोलाचे योगदान होते. पंकजनं 2010-11 मध्ये राजस्थानकडून सर्वात जास्त विकेट्स घेतल्या. तर, पुढील सिझनमध्ये 10 मॅचमध्ये 34 विकेट्स घेतल्या.
जडेजामुळे लाजिरवाणा रेकॉर्ड
पंकजनं देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केल्यानं त्याला 2014 साली इंग्लंड दौऱ्यात टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्याने तिसऱ्याच ओव्हरमध्ये एलिस्टर कुकला जवळपास आऊट केले होते. मात्र स्लिपमध्ये फिल्डिंग करणाऱ्या रविंद्र जडेजानं (Ravindra Jadeja) कुकचा सोपा कॅच सोडला. कुकनं पुढे 95 रन काढले.
ZIM vs BAN : ब्रेक डान्सनंतरचा राडा भोवला! ICC नं केली दोघांनाही शिक्षा, VIDEO
पंकजनं पहिल्या टेस्टमध्ये 179 रन दिले, पण त्याला एकही विकेट मिळाली नाही. त्यामुळे पदार्पणातील टेस्टमध्ये एकही विकेट न घेता सर्वात जास्त रन देणारा बॉलर असा लाजिरवाणा रेकॉर्ड त्याच्या नावावर नोंद झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Rajasthan Royals