बंदीनंतर पृथ्वी शॉने दिलं उत्तर, डोप टेस्टमध्ये दोषी आढळल्यानं BCCI नं केली कारवाई

बंदीनंतर पृथ्वी शॉने दिलं उत्तर, डोप टेस्टमध्ये दोषी आढळल्यानं BCCI नं केली कारवाई

पृथ्वी शॉ म्हणाला की, देशासाठी आणि मुंबईसाठी खेळणं यापेक्षा मोठं काही नाही. मी लवकरच पुनरागमन करेन. तुमच्या सर्वांच्या पाठिंब्यासाठी आभार!

  • Share this:

मुंबई, 31 जुलै : भारताचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉने पहिल्याच कसोटीत शतक करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. गेल्या काही महिन्यांपासून दुखापतीने त्रस्त असलेल्या पृथ्वीवर बीसीसीआयने बंदीची कारवाई केली आहे. डोप टेस्टमध्ये दोषी आढळल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून 15 नोव्हेंबरपर्यंत त्याला खेळता येणार नाही.

इंदौरमध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीवेळी पृथ्वी शॉच्या यूरीनचे सॅम्पल घेण्यात आलं होतं. त्यात बंदी असलेल्या पदार्थाचे सेवन केल्याचं आढळलं आहे. बीसीसीआयच्या अँटी डोपिंग प्रोग्रॅम अंतर्गत ही चाचणी करण्यात आली होती. पृथ्वी शॉच्या यूरीन सॅम्पलमध्ये बंदी असलेल्या पदार्थाचा अंश आढळला. टर्ब्यूटलाइन नावाचा हा पदार्थ कफ सिरपमध्ये वापरला जातो. या पदार्थाच्या सेवनावर वाडाने बंदी घातली आहे.

बंदीच्या कारवाईनंतर पृथ्वी शॉने ट्विटरवरून स्पष्टीकरण दिलं आहे. त्याने म्हटलं आहे की, एका कफ सिरपमधील असलेल्या पदार्थामुळे बंदी घालण्यात आली. हा कफ सिरप अजाणतेपणे घेतला होता. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीवेळी सर्दी-खोकला झाला होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना दुखापत झाली होती. त्यानंतर संघात पुनरागमन केलं होतं. पुन्हा आजारी पडू नये यासाठी औषध घेताना माझ्याकडून खबरदारी घेण्यात चूक झाली. आता जे झालं ते स्वीकारतो.

माझ्याकडून चूक झाली आणि ती मी मान्य करतो. मला आशा आहे की भारताचे इतर खेळाडू अशा गोष्टींपासून सावध होतील. अॅथलीटसना लहान आजारांवर सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. मी बीसीसीआय आणि माझ्यासोबत असलेल्या लोकांचे आभार मानतो. क्रिकेट माझं जीवन आहे. देशासाठी आणि मुंबईसाठी खेळणं यापेक्षा मोठं काही नाही. मी लवकरच पुनरागमन करेन. तुमच्या सर्वांच्या पाठिंब्यासाठी आभार! - पृथ्वी शॉ

बीसीसीआयने जाहीर केलं आहे की, 16 जुलै 2019 रोजी पृथ्वी शॉने अँटी डोपिंग रूल व्हायलेशन आणि बीसीसीआय़आच्या अँटी डोपिंग रूलचे उल्लंघन केल्याचं आढळलं आहे. पृथ्वी शॉने आपण या पदार्थाचं सेवन केल्याचं मान्य केलं. मात्र, त्याचा वापर केवळ खोकला थांबावा या उद्देशानेच केल्याचं म्हटलं आहे. बीसीसीआयनं त्याचं म्हणणं मान्य केलं तरी त्याच्या बेजबाबदारपणामुळे 8 महिन्याची बंदी घातली असल्याचं सांगितलं. पृथ्वी शॉवर 16 मार्च ते 15 नोव्हेंबर 2019 पर्यंत बंदी घालण्यात आली आहे.

SPECIAL REPORT: भाजपचा करिश्मा, निवडणूक न लढताच पालिका ताब्यात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Jul 31, 2019 10:06 AM IST

ताज्या बातम्या