World Cup : भारताच्या जर्सीसाठी भगवा रंग का निवडला?

ICC Cricket World Cup गेल्या अनेक दिवसांपासून भारताच्या भगव्या जर्सीबाबत चर्चा सुरू होती त्याला आता पूर्ण विराम मिळाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 28, 2019 09:15 PM IST

World Cup : भारताच्या जर्सीसाठी भगवा रंग का निवडला?

लंडन, 28 जून : ICC Cricket World Cup स्पर्धेचा महासंग्रामात आता चुरस वाढली आहे. सेमीफायनलला कोणते संघ पोहचतील याचाही अंदाज येऊ लागला आहे. भारताने आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये अपराजित राहत गुणतक्त्यात पहिल्या चारमध्ये आपले स्थान कायम राखलं आहे. सहापैकी पाच सामने भारताने जिंकले असून एक सामना पावसामुळे रद्द झाला. भारत पुढचा सामना 30 जूनला इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर बांगलादेश आणि लंकेविरुद्ध सामना होणार आहे.

दरम्यान भारत इंग्लंडविरुद्ध खेळताना वेगळ्या रंगाच्या जर्सीत खेळणार आहे. इंग्लंड आणि भारताच्या जर्सीचा रंग मिळताजुळता असल्याने एका संघाला सामन्यावेळी वेगळी जर्सी घालावी लागणार आहे. भारत नक्की कोणत्या रंगाची जर्सी घालणार याबाबत अद्याप अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. सोशल मीडियावर भगव्या रंगातील जर्सीचे फोटो व्हायरल होत आहेत.

इंग्लंडविरुद्ध भारत आणि अफगाणिस्तानला जर्सीचा रंग बदलावा लागेल. यात इंग्लंडला त्यांच्याच जर्सीत खेळण्याची मुभा आहे. वर्ल्ड कपचे यजमानपद इंग्लंडकडे असून त्यांना आहे त्या जर्सीत खेळता येणार आहे. आतापर्यंत भारताने वर्ल्ड कप स्पर्धेत निळ्या रंगाची जर्सी घातली पण इंग्लंडचीही जर्सी निळ्या रंगाची असल्यामुळे भारताला जर्सीचा रंग बदलावा लागणार आहे.

Loading...

भारताच्या या जर्सीचा फोटो स्पॉन्सर नाइकीने शुक्रवारी प्रसिद्ध केला आहे. भगव्या रंगात असलेल्या जर्सीचा वापर इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात होणार आहे. भारताच्या या रंगातील जर्सीवरून राजकारणही झालं.समाजवादी पार्टीचे अबू आजमी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केले. आझमी यांनी, "वर्ल्ड कपमध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीचा रंग हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळं बदलला आहे. मोदी हे देशाला भगवा रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत" असा आरोप केला. अबू आझमी यांच्या या आरोपावर शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी, "भारतीय संघाच्या जर्सीवरून नाहक राजकारण सुरु आहे. आम्ही तिरंग्यात हिरवा रंग नको याविषयी कधी बोललो का?", असा संतप्त सवाल केला आहे. आता यावर आयसीसीने उत्तर दिलं असून बीसीसीआयला आयसीसीने जर्सीचे रंग आणि डीझाईन पाठवलं होतं असं स्पष्ट केलं आहे.

टीम इंडियाच्या जर्सीचा रंग भगवा ठेवण्यामागे युवक आणि संघाच्या बेधडक वृत्तीची प्रेरणा असल्याचं आयसीसीने सांगितलं आहे. भारतीय संघ रविवारी होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ही जर्सी घालून उतरेल.

आयसीसीचे जर्सीबाबत काही नियम आहेत. या नियमानुसार एकाच रंगाची जर्सी घालून दोन संघांना सामन्यात उतरता येत नाही. त्यासाठी एका संघाच्या जर्सीचा रंग बदलला जातो. फुटबॉलच्या सामन्यात या नियमाचा वापर केला जातो. त्याच धर्तीवर क्रिकेटमध्ये हा नियम आयसीसीने अवलंबला आहे.

वाचा- भारताच्या विजयाने पाकिस्तान खुश, सेमीफायनलची समीकरणे बदलली

वाचा- World Cup : विराटचं ट्रम्प कार्ड, शमी म्हणजे विजयाची हमी!

वाचा- VIDEO : पाहा पांड्याचं कूल सेलिब्रेशन, विकेट मिळताच बसून वाजवल्या टाळ्या!

फुटबॉल खेळणारा हत्ती कधी पाहिलाय का? VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 28, 2019 09:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...