भारताच्या 3 दिग्गज खेळाडूंचा पहिला टी20 सामना ठरला होता अखेरचा!

सलग 3 षटकार मारणाऱ्या भारताच्या दिग्गज खेळाडूलासुद्धा फक्त एकच आंतरराष्ट्रीय टी 20 सामना खेळण्याची संधी मिळाली.

  • Share this:

एकदिवसीय क्रिकेट आणि कसोटी क्रिकेटच्या तुलनेत टी20 ची लोकप्रियता सर्वाधिक आहे. भारतात आयपीएलने टी20 मध्ये तर वेगळीच उंची गाठली. भारतासह इतर देशांमध्येही लीग सुरू झाली. भारतानेच टी20 चा पहिला वर्ल्ड कप जिंकला. दक्षिण आफ्रिकेत 2007 मध्ये हा वर्ल्ड कप झाला होता.

भारताने पहिला आंतरराष्ट्रीय टी 20 सामना 2006 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. यात 6 विकेटनं विजय मिळवला होता. धोनी शून्यावर तर दिनेश कार्तिक 31 धावांवर नाबाद राहिला होता. त्यानंतर भारताने आतापर्यंत 115 सामने खेळले असून 71 वेळा विजय मिळवला आहे. 41 सामन्यात पराभव झाला असून 3 सामने अनिर्णित राहिले आहेत. यामध्ये काही खेळाडू असे आहेत ज्यांचा पहिला टी20 सामना अखेरचा टी20 सामना ठरला.

भारताच्या पहिल्याच टी20 सामन्यात दिनेश मोंगियाने 45 चेंडूत 38 धावा केल्या होत्या. यात चार चौकाराचा आणि एका षटकाराचा समावेश आहे. त्यानंतर त्याला टी20 मध्ये खेळण्याची संधीच मिळाली नाही. मोंगियाला आयपीएलमध्येसुद्धा संधी मिळाली नाही.

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरला सुद्धा फक्त एकच आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळला. भारताच्या पहिल्या सामन्यात आफ्रिकेविरुद्ध सचिनने 12 चेंडूत 10 धावा केल्या होत्या. याशिवाय गोलंदाजी करताना 2.3 षटकांत 12 धावा देत एक गडी बाद केला होता. सचिनचा हा पहिला आणि शेवटचा टी20 सामना ठरला.

भारतीय संघात द वॉल या नावाने ओळखल्या जाणाऱ्या राहुल द्रविडने 31 ऑगस्ट 2011 ला भारतीय संघात टी20 मध्ये पदार्पण केले. इंग्लंडविरुद्धच्या त्या सामन्यात भारताला 6 गडी राखून पराभव पत्करावा लागला होता. द्रविडने 21 चेंडूत 31 धावा केल्या होत्या. यात एकाच षटकात सलग तीन षटकारही मारले होते. त्यानंतर राहुल द्रविडने एकही आतंरराष्ट्रीय टी20 सामना खेळला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 24, 2019 10:34 AM IST

ताज्या बातम्या