शाळेतल्या मैत्रिणीशी केलं लग्न, बॉलिवूड कथेप्रमाणे आहे अजिंक्य रहाणेची Love Story!

शाळेतल्या मैत्रिणीशी केलं लग्न, बॉलिवूड कथेप्रमाणे आहे अजिंक्य रहाणेची Love Story!

अजिंक्य (Ajinkya Rahanae) आणि राधिका लहानपणापासून एकाच कॉलनीत राहत होते. त्यांची शाळा आणि कॉलेज एकच होते. त्याचबरोबर दोघांच्या कुटुंबीयांची देखील परस्परांची चांगली ओळख होती.

  • Share this:

मुंबई, 23 जानेवारी : अजिंक्य रहाणेनं (Ajinkya Rahane) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन टेस्टमध्ये (IND vs AUS) भारतीय टीमचं (Team India) नेतृत्व केलं. त्याच्या कॅप्टनसीखाली भारतानं ही मालिका जिंकली. या ऐतिहासिक विजयानंतर अजिंक्य रहाणेचा संपूर्ण देशाला अभिमान वाटत आहे. मुंबईत तो काही दिवसांपूर्वी परतला तेंव्हा त्याचं अगदी जल्लोषात स्वागत करण्यात आलं.

शांत आणि साधा स्वभाव

अजिंक्य रहाणेला राहुल द्रविडचा (Rahul Dravid) उत्तराधिकारी मानलं जातं. त्याची दोन कारणं आहेत. पहिलं म्हणजे तो क्रिकेटच्या मैदानात द्रविडसारखा झुंजार आहे. त्याचबरोबर मैदानाच्या बाहेर त्याचा द्रविडसारखाच शांत आणि लाजरा स्वभाव आहे. अजिंक्यसोबत त्याची पत्नी राधिका अनेकदा दिसते. या दोघांची लव्हस्टोरी खूप जुनी आहे.

अजिंक्यची लव्ह स्टोरी

अजिंक्य आणि राधिका लहानपणापासून एकाच कॉलनीत राहत होते. त्यांची शाळा आणि कॉलेज एकच होते. त्याचबरोबर दोघांच्या कुटुंबीयांची देखील परस्परांची चांगली ओळख होती. सततच्या सहवासातून दोघांमध्ये पहिल्यांदा मैत्री झाली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

(हे वाचा-'वंदे मातरम'नं दणाणून निघालेल्या स्टेडिअमचा तो VIDEO ऑस्ट्रेलियाचा नव्हेच)

गुपचुप सुरु होतं डेटिंग

त्या काळात कुणालाही समजणार नाही अशा पद्धतीनं राधिकाला डेटवर नेत होतो, अशी कबुली अजिंक्यनं यापूर्वी एका मुलाखतीमध्ये दिली होती. अर्थात त्यांचं हे गुपित फार काळ टिकलं नाही. दोघांच्याही घरच्यांना लवकरच ही बातमी समजली. त्यांनी आनंदानं त्यांच्या लग्नाला परवानगी दिली. त्यानंतर 26 डिसेंबर 2014 रोजी अजिंक्य आणि राधिकाचं लग्न झालं. अजिंक्यला मोठा क्रिकेटपटू झालेलं पाहणं हे दोन्ही परिवाराचं स्वप्न होतं.

लग्नात रागावली होती राधिका!

अजिंक्य रहाणे लग्नात झालेली चूक कधीही विसरु शकत नाही. लग्नाच्या वेळी तो त्याच्या नातेवाईकांसह राधिकाच्या घरी पोहचला तेंव्हा तिच्या घरातील मंडळी आश्चर्यचकित झाले होते. अजिंक्य त्यावेळी पिवळ्या रंगाचा टी शर्ट आणि जीन्स पँटमध्ये गेला होता. त्याला त्या कपड्यात पाहताच राधिका चांगलीच रागावली होती. अजिंक्य आजही ती त्याच्या आयुष्यातील मोठी चूक मानतो. वास्तविक अजिंक्यला व्यस्त वेळापत्रकामुळे लग्नाची शॉपिंग करायला वेळ मिळाला नव्हता.

(हे वाचा-आर्थिक अडचणीत पाकने BCCI विरोधात खर्च केले 33 कोटी; क्रिकेटर समोर पडले तोंडघशी)

राधिका हेच सर्वस्व!

ऑस्ट्रेलियातील टेस्ट सीरिजमध्ये सर्व आव्हान खंबीरपणे परतावणारा अजिंक्य आपण पाहिला आहे. या कामगिरीसाठी अजिंक्य नेहमी राधिकाला  प्रेरणास्रोत समजतो. राधिका आपल्याला नेहमीच समजून घेतलं आहे, असं अजिंक्य सांगतो. त्या दोघांना एक मुलगी देखील आहे. राधिकाला साधं आयुष्य जगायला आवडतं. ती नेहमीच ग्लॅमर विश्वापासून दुर असते. तसंच सोशल मीडियावरही ती फार सक्रीय नाही.

Published by: News18 Desk
First published: January 23, 2021, 1:12 PM IST

ताज्या बातम्या