विंडीज दौऱ्यानं विराटची झोप उडवली, विश्रांती नाहीच!

विंडीज दौऱ्यानं विराटची झोप उडवली, विश्रांती नाहीच!

वर्ल्ड कपदरम्यान विराट विंडीज दौऱ्यावर जाणार नाही असं म्हटलं जात होतं.

  • Share this:

मुंबई, 22 जुलै : वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ रविवारी जाहीर करण्यात आला. वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलला न्यूझीलंडविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यानंतर भारताच्या संघ निवडीची उत्सुकता लागून राहिली होती. त्यातच धोनीच्या निवृत्तीची आणि विराट-रोहितमधील दुराव्याची चर्चा होत होती. आता संघ जाहीर केल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू असतानाच वेस्ट इंडीज दौऱ्याची चर्चा रंगली होती. त्यावेळी विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली जाईल असं मह्टलं जात होतं. दोघेही गेल्या वर्षभरापासून सातत्यानं क्रिकेट खेळत असून त्यांना विश्रांतीची गरज असल्याचं सांगितलं जात होतं.

रविवारी संघाची निवड जाहीर करण्यात आली तेव्हा तीनही प्रकारात विराट कोहलीच नेतृत्व करणार असल्याने त्याच्या विश्रांतीचा प्रश्न बाजूला पडला. तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला मात्र मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून विश्रांती देण्यात आली आहे. आता वर्ल्ड कपदरम्यान कोहलीच्या विश्रांतीची चर्चा महिनाभर सुरू होती. मात्र अचानक असं काय झालं की त्यानं विश्रांती न घेता वेस्ट इंडीज दौऱ्यात खेळण्याचा निर्णय घेतला.

दरम्यानच्या काळात वर्ल्ड कपमधील भारताच्या पराभवाने कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्न विचारले जात होते. अनेकांनी वनडे आणि टी20 मध्ये रोहित शर्माकडे नेतृत्व द्यायला हवं असं म्हटलं होतं. याशिवाय विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा रंगली होती. अशा परिस्थितीत जर विंडीज दौऱ्यावर विराट गेला नसता तर पुन्हा पुढच्या दौऱ्यावेळी रोहितच्या कामगिरीची चर्चा केली जाईल. तसेच कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्न वाझतील. अशावेळी कर्णधार म्हणून संघात पुनरागमन करणं कोहलीसमोर आव्हानात्मक ठरलं असतं म्हणूनच त्यानं वेस्ट इंडीज दौऱ्यावर विश्रांती घेतली नाही असं म्हटलं जात आहे.

वर्ल्ड चॅम्पियन कर्णधार देश सोडण्याच्या तयारीत, निवृत्तीनंतर जाणार परदेशात

वर्ल्ड कपमध्ये पराभवानंतर संघ व्यवस्थापनावर टीका करण्यात येत होती. त्यामुळे कोहलीला कर्णधारपद टिकवण्यासाठी आणि स्वत:ला सिद्ध करायचे असेल तर संघात राहण्याची गरज आहे. विराट वेस्ट इंडीज दौऱ्यावर गेला नसता तर त्याचे कर्णधारपद धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती.

World Cupमध्ये घेतला पण विंडीज दौऱ्यातून वगळला, निवड समितीने सांगितलं कारण

वेस्ट इंडीज दौऱ्यावर भारतीय संघात नवे खेळाडू जातील अशी चर्चा होती. मात्र, धोनी वगळता जवळपास संपूर्ण संघ हा अनुभवी खेळाडूंचा असणार आहे. वर्ल्ड कपमधील पराभवानंतर बीसीसीआयनं हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जात आहे.

सचिनने केलं अभिनंदन, हिमा म्हणाली एक स्वप्न पूर्ण झालं

तुफान आलंया... पाण्याच्या थेंबानं गावात केली क्रांती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Jul 22, 2019 11:46 AM IST

ताज्या बातम्या